Salman Khan : सलमान खानकडून तब्बल २८ दिवसांनी चाहत्यांना मोठं सरप्राइज; 'सिकंदर'शी खास कनेक्शन

Salman Khan News : बॉलिवूडचा भाईजानचा २८ दिवसांनी चाहत्यांना सरप्राइज देणार आहे. या सरप्राइजचं 'सिकंदर'शी खास कनेक्शन आहे.
Salman khan news
Salman Khan NewsSaam Tv
Published On

मुंबई : सलमान खानच्या आगामी सिनेमा 'सिकंदर'च्या अपडेट्सवर साऱ्यांच्या नजरा आहेत. 'सिकंदर' सिनेमाची अनेकांना उत्सुकता आहे. सलमानचा हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी काही महिने शिल्लक राहिले आहेत. या सिनेमाविषयी सलमानच्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. 'सिकंदर' सिनेमासाठी सलमान खानने पहिल्यांदा दक्षिण दिग्दर्शक ए आर मुरुगदास यांच्याशी हातमिळवणी केली. दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि बॉलिवूड सुपस्टारकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. याचदरम्यान, सलमान खान वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना मोठं सरप्राइज देण्याच्या तयारीत आहे.

सलमान खान २७ डिसेंबर रोजी त्याचा ५९ वा जन्मदिन साजरा करणार आहे. भाईजानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणासारखा असतो. वाढदिवसाचं औचित्य साधून सलमान खान त्याच्या चाहत्यांना खूश करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान २७ डिसेंबर रोजी 'सिकंदर' सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी देखील सलमान खानच्या वाढदिवसाची तारीख निवडली आहे.

Salman khan news
Salman Khan: सलमान खानला धमकीचे संदेश पाठवल्याचा आरोप, पोलिसांनी 24 वर्षीय तरुणाला केली अटक

'सिंकदर' मध्ये सलमान खान दमदार अॅक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी सलमान खानने अॅक्शन आणि लूक्सवर मोठी मेहनत घेतली आहे. यामुळे सलमान खानच्या 'सिंकदर' सिनेमाच्या फर्स्ट लूककडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. यामुळे सलमान खानच्या चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे.

सलमान खानचा हा सिनेमा ईदच्या औचित्यावर प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमामध्ये ईद आणि होळीच्या सणावरील गाणे देखील आहेत. अॅक्शन सिनेमा आवडणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे.

Salman khan news
Bandra Terminus stampede : वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, ९ जण जखमी; थरारक VIDEO समोर

'सिकंदर' सिनेमात जबरदस्त अॅक्शन असणार आहे. या सिनेमात ट्रेनशी संबंधित एक सीन देखील असल्याची माहिती मिळाली आहे. या सीनसाठी लवकरच शुटिंग होणार आहे. यात सलमान खान थेट ट्रेनच्या छतावर अॅक्शन करताना दिसणार आहे. धावत्या ट्रेनवर सलमान शत्रूंशी दोन हात करताना दिसणार आहे.

Salman khan news
Salman Khan: 'सलमान खानमध्ये हिंमत असेल तर त्याला वाचव', लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अभिनेत्याला पुन्हा धमकी; ते गाणं आलं चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com