Salman Khan
Salman KhanSaam Tv

Salman Khan: 'सलमान खानमध्ये हिंमत असेल तर त्याला वाचव', लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अभिनेत्याला पुन्हा धमकी; ते गाणं आलं चर्चेत

Salman Khan Threat Call: सलमान खानला धमक्या येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नुकतंच गुरूवारी अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आली आहे.
Published on

सलमान खानला धमक्या येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नुकतंच गुरूवारी अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला धमकी आली आहे. मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षा सलमान खानच्या धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास धमकीचा फोन आला आहे. आता पुन्ही सलमान खानला धमकी कोणी दिली आहे. याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Salman Khan
Nitin Chauhaan: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं निधन, अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

माहितीनुसार, सलमान खानला नुकतीच मिळालेली धमकी ही एका गाण्यामुळे मिळाली आहे. गाण्यामध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या नावांचा समावेश आहे. या गाण्याचे गीतकार यांच्यानावे ही धमकी मिळाली असून सलमान खानमध्ये हिंमत असेल तर त्याला वाचव असे धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे.

Salman Khan
Rupali Bhosle: राहायला घर नाही, खायला पैसे नाहीत, पावसात भिजून काढले दिवस, रूपाली भोसलेचा प्रेरणादायी प्रवास वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील ३२ वर्षीय भिखाराम याला यामध्ये अटक केली आहे. भिखारामने सलमान खानला धमकी दिली होती त्याने ५ कोटी रूपयांची खंडणी मागितल्यांच स्पष्ट झालं आहे. यानुसार पोलिसांनी भिखारामला कर्नाटकातील हावेरी येथून अटक केले आहे.

सलमान खानचे निकटवर्तीय, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला सुद्धी जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या धमक्यामुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com