Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : गाढवामुळे टायगर अडचणीत, PETA नं सुनावले खडेबोल अन् भाईजानला केलं आव्हान

Salman khan : गाढवाच्या घरात राहण्यामुळे सलमान खानचा बिग बॉस शो अडचणीत येणार आहे. कसं? संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' च्या (Bigg Boss 18) धमाकेदार पर्वाला सुरुवात झाली आहे. यंदाचा सीझन खूप खास आहे. कारण माणसांसोबत आता बिग बॉसच्या घरात प्राणी देखील राहत आहे. बिग बॉसच्या घरात गाढवाची एन्ट्री झाली आहे. हा गाढव गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचा आहे. या गाढवाचे नाव 'गधराज' असे आहे. बिग बॉसच्या घरात गाढव राहिल्याने प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काहींना हे मनोरंजक वाटत आहे तर काहींना हे चुकीचे वाटत आहे.

गुणरत्न सदावर्तेंच्या गाढवामुळे सलमानचा बिग बॉस शो अडचणीत येणार आहे. प्राण्यांच्या संगोपन करणाऱ्या 'पेटा' या संस्थेने बिग बॉसला चांगलेच सुनावले आहे. हा प्राणी बिग बॉसच्या घरात पूर्ण वेळ बांधून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या संस्थेने आपली नाराजी व्यक्त केली. 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स'(पेटा) बिग बॉसच्या निर्मात्यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पत्रात लिहिलं की, " बिग बॉसच्या घरात गाढवाला ठेवल्यामुळे अनेक लोकांकडून नाराजीची तक्रारी होत आहे. त्यांचे बोलणे बरोबर आहे. याकडे दुर्लक्ष करू नये. ही गोष्ट गंभीर घ्यावी."

'पेटा' संस्थेने भाईजानला (Salman khan) आवाहन केलं आहे की, तुम्ही तुमच्या स्टार पॉवरचा वापर करून घरातील गाढवाला आमच्या संस्थेकडे सुपूर्द करावे. जेणेकरून त्याला खुल्यात अभयारण्यात ठेवता येईल. तसेच मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर करणे टाळा असेही म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT