News Policy For School Teachers : गाढव, घुबड आणि उंट...! विद्यार्थ्यांना टोमणे देणे होणार बंद, शिक्षकांच्या संतापावर मर्यादा

Bihar School Teachers : बिहार सरकारने विद्यार्थ्यांना टोमणे मारणाऱ्या शिक्षकांवर लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकराने एकंदरीत शिक्षकांच्या संतापावर मर्यादा आणल्या आहेत.
teacher news
teacherSaam Digital
Published On

Bihar News : बिहार सरकारने विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. बिहार सरकारच्या निर्णयाने शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दिलेले जाणारे टोमणे बंद होणार आहे. काही शिक्षक शारीरिक व्यंगावरून विद्यार्थ्यांना टोमणे मारतात. याच टोमण्यावर सरकारने मर्यादा आणल्या आहेत.

सरकारकडून शिक्षकांच्या टोमण्यावर बंदी

काही शिक्षक वर्गात सर्रास विद्यार्थ्यांना गाढव, रंगाने सावळा असेल तर त्याला 'कल्लू' असे टोमणे मारतात. या टोमण्यावर बंदी घालण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. बिहारच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

नव्या आदेशानुसार, बिहारमध्ये सरकारी शाळेत शिक्षकांना मस्करीत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व्यंगावर बोलता येणार नाही. शिक्षण विभागाचं म्हणणं आहे की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आदर केला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या प्रतिष्ठेचा सन्मान केला पाहिजे. विभागाच्या आदेशानुसार, शिक्षकांना विद्यार्थ्यांना टोपणनावाने हाक मारता येणार नाही.

teacher news
MPSC Student protest : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची, पाहा VIDEO

अभ्यासात कच्चा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार मॉनिटर पद

शिक्षक विभागाच्या आदेशानुसार, आता अभ्यासात कच्चा असणाऱ्या विद्यार्थ्याला देखील मॉनिटर बनण्याची संधी मिळणार आहे. शाळेला कंटाळून घर सोडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना समजवण्याची जबाबदारी नव्या मॉनिटरवर असणार आहे. मॉनिटर त्यांना शाळेत येण्यासाठी प्रेरित करेल. तसेच वर्गातील वातावरण चांगलं राहावं, यासाठी मदत करेल.

teacher news
OBC Community: मोठी बातमी; ओबीसीमध्ये नव्या १५ जातींचा समावेश करण्याची केंद्राकडे राज्य सरकारची शिफारस

विभागाकडून आणखी एक आदेश

शिक्षण विभागाकडून आणखी एक आदेश देण्यात आला. 'शिक्षक आणि पालकांच्या बैठकीत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून तणावात आणणार नाही. तर विद्यार्थ्यांना देखील शिक्षकांच्या चांगल्या आणि वाईट बाजू सांगण्याची परवानगी असणार आहे. विद्यार्थ्यांकडून सूचना मिळाल्यानंतर शाळेचे मुख्याधापक हे व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर देतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com