Sakhi Gokhale's Instagram @sakheeg
मनोरंजन बातम्या

Sakhi Gokhale: 'गोखले काका आणि माझे बाबा...' सखी नेटकऱ्यांवर संतापली, कारण?

विक्रम गोखलेंच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीनेही श्रद्धांजली वाहिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sakhi Gokhale: मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी प्रदिर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. २६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंनी अखेरचा श्वास घेतला होता.

विक्रम गोखलेंच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीनेही श्रद्धांजली वाहिली. सोबतच गोखलेंच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी अनेक जुने किस्से, फोटो आणि पोस्ट्स सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात शेअर केल्या आहेत. पण त्यातील काही गोष्टी आता चुकीचे असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याबाबत अभिनेत्री सखी गोखलेने एक पोस्ट शेअर केली होती. इंटरनेटवर विक्रम गोखले सखीचे काका असल्याचे दाखवत आहे. तसेच विक्रम गोखलेंसंबंधित एकही पोस्ट शेअर न केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. या प्रकरणावर तिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सखी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हणते, एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की, विक्रम गोखले दिग्गज अभिनेते होते. लहान असताना त्यांची पडद्यावरील अभिनयाची जादू मी अनुभवली आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील मोठी पोकळी कधीही न भरुन निघणारी आहे. आणखी एक बाब म्हणजे, गोखले काका आणि माझे बाबा भाऊ नव्हते. आमच्यात कोणतेही नाते नाही. ते फॅमिली फ्रेंड्स होते इतकंच.

इंटरनेटवर व्हायरल होत असणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आज काल इंटरनेटवर कोणालाही कोणाचे नातेवाईक बनवता येतात. तुम्हाला तिकडेच तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं मिळत असतील, तर दोष तुमच्यात आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, आमच्यात काही नातं होतं किंवा नव्हतं...मी त्यांच्याबद्दल काही पोस्ट करावी किंवा नाही, हा माझा प्रश्न आहे. एखाद्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर नाही केली तर, त्याचं दु:ख खरं नसतं का? असा प्रश्नही तिने नेटकऱ्यांना विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT