Bigg Boss 16: गोल्डन मॅनची 'बिग बॉस १६मध्ये एन्ट्री, घरातील समीकरणे बदलणार का?

'बिग बॉस 16'च्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.
Bigg Boss 16 wild card entry
Bigg Boss 16 wild card entry Instagram @realsunnynanasahebwaghchoure

Bigg Boss 16 Wild Card Entry: 'बिग बॉस 16' हा रिऍलिटी शो जरी वादग्रस्त असला तरी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कुठेही कमी नाही. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक ट्रॉफी जिंकण्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहेत. आता या कार्यक्रमात मोठा धमाका होणार आहे. कारण 'बिग बॉस 16'च्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. गोल्डन बॉय अशी ओळख असलेला सनी नानासाहेब वाघचौरे हा या शोमध्ये एन्ट्री करणार पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक असणार आहे.

Bigg Boss 16 wild card entry
Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या बॅटिंगने चाहते क्लीन बोल्ड, अभिनेत्रीला पाहून क्रिकेटप्रेमी विराटलाही विसरले

'बिग बॉस'च्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. गोल्डन किंग ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेला सनी नानासाहेब वाघचौरे हा 'बिग बॉस'च्या घरामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार पहिला स्पर्धक आहे. सनीने स्वतः याविषयी सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सनीने ही माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करत सनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'शेवटी स्वप्न पूर्ण झाले, 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी होत आहे.' (Bigg Boss)

सनी नानासाहेब वाघचौरेची बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. गोल्डन मॅनच्या एन्ट्री घरातील वातावरण किती बदलणार हे पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील. सनीच्या येण्याने घरच्यांना काय सहन करावे लागेल, हे आपल्याला येणाऱ्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. (TV)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com