Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या बॅटिंगने चाहते क्लीन बोल्ड, अभिनेत्रीला पाहून क्रिकेटप्रेमी विराटलाही विसरले

जान्हवीने तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
Janhvi Kapoor Upcoming Movie Look
Janhvi Kapoor Upcoming Movie LookInstagram@janhvikapoor

Janhvi Kapoor New Look: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपट आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवीचा फॅशन सेन्स कमाल आहेच, तसेच ती अभिनय देखील मागे नाही. धडक या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या जान्हवीने रुही, गुंजन सक्सेना आणि गुड लक जेरी यांसारख्या चित्रपटातून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आता जान्हवीने तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तिने या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.

Janhvi Kapoor Upcoming Movie Look
Prabhas-Kriti Sanon: प्रभासच्या हृदयात परमसुंदरी, 'या' अभिनेत्याने सांगितलं 'ती' नेमकी कोण?

जान्हवी कपूरने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती क्रिकेट खेळताना दिसत आहे. जान्हवी कपूर 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता तिने या चित्रपटाच्या सेटवरील तिचा पहिला फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "एक मिनिट झाला." तसेच तिने बॅट आणि बॉलचे इमोजी शेअर केला आहे आणि हॅशटॅगमध्ये चित्रपटाचे नाव देखील लिहिले आहे. (Janhvi Kapoor)

जान्हवीच्या या पोस्टवर तिला जवळचा मित्र ओरहान अवतारमणीने सरप्राईझ चेहऱ्यातील इमोजी कमेंट केला आहे. जान्हवीचा क्रिकेटर अवतार पाहून चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत. विराटल माफ करा, पण जान्हवी माझी आवडती क्रिकेटर आहे, असे एका युजरने लिहिले आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, "आता टीम इंडियाला हिची गरज आहे."

काही युजर्सनी मजेशीर कमेंटही केल्या. एकाने लिहिले, "केएल राहुलची रिप्लेसमेंट सापडली." एकाने प्रश्न विचारत लिहिले की, "क्रिकेट कधीपासून." जान्हवीने रविवारी हा फोटो शेअर केला होता. आतापर्यंत या फोटोला 6 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

जान्हवी कपूर अलीकडेच 'मिली' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. आता अभिनेत्रीने पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. मिस्टर अँड मिसेस माहीमध्ये जान्हवीसोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Movie)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com