Rinku Rajguru New Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rinku Rajguru New Movie: रिंकू राजगुरूचा नवीन चित्रपट येतोय; सेटवरचे फोटो केले शेअर

Jijai New Movie: झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Manasvi Choudhary

सैराट फेम प्रसिद्ध अभिनेत्री रिंकु राजगुरू नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकूने तिच्या नवीन चित्रपटाची नुकतच घोषणा केली आहे. सोशल मीडियावरील रिंकूच्या नवीन पोस्टने सर्वाचेच लक्ष वेधले आहे.

चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो रिंकूने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. चित्रपटात मुख्य भूमिकेत रिंकु राजगुरू दिसणार आहे. कपाळी चंद्रकोर मराठमोळ्या रूपात रिंकु या चित्रपटात अनोख्या अंदाजात दिसतेय आहे. अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत.

झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला लहान मुलांनसोबत घ्या पतंग उडविण्याचा आनंद

Valentine Day Love Letter: प्रवासात 'ती' आठवली अन् डोळे पाणावली! अपूर्ण प्रेमाची स्वप्ने पत्रात रंगवली

Accident : भरधाव थारने ६ जणांना चिरडले, संतापलेल्या जमावाने कार पेटवली, रस्त्यावरच राडा

E-Sakal No.1: नवीन वर्षाची नवी सुरुवात! ई-सकाळ ठरली नंबर 1 वेबसाइट

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT