Saif Ali Khan Attacker Bangladesh Connection Saam Tv (Youtube)
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Attack Update : सैफच्या हल्लेखोराला अखेर बेड्या, हल्लेखोर शेहजादचं बांग्लादेशी कनेक्शन

Saif Ali Khan Attacker Bangladesh Connection : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हल्लेखोराचं बांग्लादेश कनेक्शन उघड झालंय. या आरोपीनं दोन दिवस कसा गुंगारा दिला? त्याला कुठून जेरबंद केलं? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Girish Nikam

Saif Ali Khan Attack News : तीन दिवसांपासून मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा सैफवरील हल्लेखोर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाच. मुंबई पोलिसांची अनेक पथकं वेगवेगळ्या दिशेने तपास करीत होते. अगदी मध्य प्रदेशपर्यंत पथक पोहचलं होतं. वांद्रे, दादर परीसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केलं होतं. हल्ल्यानंतर दादरमध्ये एका मोबाईल दुकानाच्या सीसीटीव्हीत दिसलेला हल्लेखोर नंतर कुठे लपला हे गुढ होतं. पण मुंबई पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करत अखेर त्याला पकडलंच. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटच्या परिसरातील लेबर कॅम्पमधून त्याला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे त्याचं बांग्लादेशी कनेक्शन समोर आलंय.

सैफवर हल्ला, आरोपीला बेड्या

- आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद

- आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त

- आरोपी 6 महिन्यांआधी मुंबईत आला, 3 नावं बदलली

- आरोपीचं विजय दास, बिजॉय दास नावानं ठाण्यात वास्तव्य

- सैफ अली खानवर हल्ला केल्याची कबुली

आरोपी शेहजादला वांद्रे कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे....आरोपीकडे भारतीय असल्याचे पुरावे नाहीत. भारतात घुसल्यानंतर आरोपी त्याच नाव बदलत होता.ठाण्यातल्या एका बारमध्ये तो हाऊसकिपींगचही काम करत होता. मालकाकडून त्यानं पैसे घेतले होते. बांगलादेशात तो पळ काढण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात.

सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपीनं एकाला कॉल केला होता. त्यानंतर त्यानं फोन बंद केला होता. या एका कॉलवरुन पोलिसांना ठाण्याच्या त्याच्या वास्तव्यापर्यंतचे धागेदोरे सापडले. आरोपीने हल्ला केला तेव्हा परिधान केलेला काळा टी शर्ट, गुलाबी गमछा तसंच त्यानंतर बदललेला निळा शर्टही पोलिसांनी जप्त केला. आरोपीला पकडलं तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडल्याची माहिती मिळतेय. आरोपी शेहजाद वरळी येथील एका कॅफेमध्येही सफाईच काम करत असे. जवळच असलेल्या जनता कॉलनीत तो वास्तव्याला होता. हल्ला नंतर तो वरळीत राहिल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतंच बांग्लादेशी घुसखोरांच्या प्रश्नावर बोट ठेवुन कडक कारवाईची ग्वाही दिली होती. सैफवरील हल्लानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT