Political Update : '२० कोटी रुपये द्या, अन्यथा परिणाम भोगा; खासदाराला फोनवरून मागितली खंडणी, राजकीय वर्तुळात खळबळ

death threat to political leader : राजकीय वर्तुळातून खळबळजनक घटना समोर आली आहे. '२० कोटी रुपये द्या, अन्यथा परिणाम भोगा, असे म्हणत एकाने थेट खासदाराला धमकी दिल्याची घटना घडली आहे.
'२० कोटी रुपये द्या, अन्यथा परिणाम भोगा;  खासदाराला फोनवरून मागितली खंडणी, राजकीय वर्तुळात खळबळ
Political Updategoogle
Published On

नवी दिल्ली : बिहारच्या राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी हाती आली आहे. बिहारचे राज्यसभा खासदार संजय यादव यांना २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची सचिवालय कार्यालयात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. शनिवारी त्यांना धमकीचा कॉल आला होता. त्यांना फोन करून २० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा तपास सुरु केला आहे.

बिहारच्या खासदाराला १८ जानेवारी रोजी फोन आला होता. फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटलं की, 'मी गँगस्टर आहे. आमचे अनेक लोक जेलमध्ये आहे. मी आता अमेरिकेतून बोलत आहे. मला २० कोटी रुपये द्या, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा. तुमचा रोजचा यायचा आणि जायचा रस्ता आम्हाला माहीत आहे. तुमच्या घरातील लोकही माहीत आहे. तुम्हाला किती मुले आहेत, हे देखील माहीत आहे. सर्व व्यवस्थित पाहिजे असेल, तर २० कोटी रुपये द्या'.

'२० कोटी रुपये द्या, अन्यथा परिणाम भोगा;  खासदाराला फोनवरून मागितली खंडणी, राजकीय वर्तुळात खळबळ
Crime News: शाळेत जाताना अल्पवयीन मुलीची वाट अडवली, लॉजवर घेऊन गेले अन्...

खासदाराने सांगितलं की, 'शनिवारी ३.३० वाजता दोन मिस कॉल आले होते. त्यानंतर माझ्या सहकाऱ्याने ४ वाजता कॉल उचलला. त्यानंतर फोन माझ्याकडे दिला. त्यानंतर पुन्हा ४ वाजून २२ मिनिटाला पु्न्हा फोन आला. खासदाराने फोनवर म्हटलं की, 'मी राज्यसभा खासदार आहे'. त्यानंतर फोनवरील त्या व्यक्तीने म्हटलं की, मला माहीत आहे. तुम्ही राज्यसभा खासदार असा, मंत्री असा किंवा पंतप्रधान...आम्ही कोणावरही गोळ्या झाडू शकतो'.

'२० कोटी रुपये द्या, अन्यथा परिणाम भोगा;  खासदाराला फोनवरून मागितली खंडणी, राजकीय वर्तुळात खळबळ
Pune Crime : आधीच कोयता गँगची दहशत, आता पिस्तुलधारकांचा सुळसुळाट; मध्य प्रदेश कनेक्शन आलं समोर
'२० कोटी रुपये द्या, अन्यथा परिणाम भोगा;  खासदाराला फोनवरून मागितली खंडणी, राजकीय वर्तुळात खळबळ
Jalgaon Crime: जळगाव हादरले! जुन्या वादातून भरदिवसा कुटुंबावर जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू; ५ गंभीर

खंडणीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, संजय यादव यांची गणना तेजस्वी यादव यांच्या निकटवर्तीयमध्ये केली जाते. २०२२ साली सीबीआयने रेल्वे जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी प्रकरणात तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय संजय यादव यांची चौकशी केली होती. संजय यादव हे तेजस्वी यादव यांचे मित्र आणि राजकीय सल्लागार देखील आहेत. संजय यादव यांना धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com