Pune Crime : आधीच कोयता गँगची दहशत, आता पिस्तुलधारकांचा सुळसुळाट; मध्य प्रदेश कनेक्शन आलं समोर

Pune Crime : पुण्यात कोयता गँगच्या दहशतीनंतर पिस्तुलधारकांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. पुणे पोलिसांनी पिस्तूल वापरणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. या कारवाईनंतर मध्य प्रदेश कनेक्शन उघड झालं आहे.
Pune Police news
Pune Police Google
Published On

अक्षय बवडे, साम टीव्ही

पुणे : पुण्यात कोयत्याने दहशत माजवणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्यााचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता पुण्यातील विविध ठिकाणाहून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ७ पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. या सर्व ७ पिस्तूल आणि त्यासोबत असलेले जिवंत काडतुसे वापरणाऱ्या ९ जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

Pune Police news
Crime News: मित्र झाले सैतान! नोकरीसाठी मुंबईत नेलं, मुलावर केला लैगिंक अत्याचार

अटक करण्यात आलेल्या ९ जणांचे पिस्तूल बाळग्ण्यासाठीचे अनेक कारणं आहेत. काही जणांनी जमिनीच्या वादातून स्वतःचे रक्षण करण्यासाठी पिस्तूल विकत घेतले आहेत तर काही जणांनी वर्चस्व राहावं यासाठी या पिस्तूल खरेदी केल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे हे सर्व पिस्तूल मध्य प्रदेशमधून अगदी कमी किंमतीत आणलं जात. या पिस्तूलची विक्री पुढे लाखो रुपयांमध्ये होते हे सुद्धा समोर आलं आहे.

Pune Police news
Cyber crime news: पुण्यात सायबर फ्रॉडचा सुळसुळाट! पोलिसांनी नेपाळी गँगचा 'असा' केला पर्दाफाश

या प्रकरणात सागर ढेबे या तरुणासह इतर ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सागरवर याआधी पुण्यातील अनेक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या निमित्ताने पुण्यात गुन्हेगारांच्या हाती पिस्तूल येण्याचे मध्य प्रदेश कनेक्शन सुद्धा समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळ याच्या हत्येच्या बदला आणि कोथरूडमध्ये वर्चस्व राहावं यासाठी तरुणांनी जे पिस्तूल आणलं होतं, ते सुद्धा मध्य प्रदेशमधूनच आणले होतं.

Pune Police news
Ulhasnagar Crime: तरुणावर प्राणघातक हल्ला, मदत करणाऱ्या महिलेचा ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या ३ ते ४ गावांमध्ये हे पिस्तूल अगदी सहजपणे मिळतात. पुणे किंवा इतर शहरांपासून हे ठिकाणं जवळ असल्यामुळे गुन्हेगार सुद्धा अशा ठिकाणांना प्राधान्य देत आहेत. मध्य प्रदेशातून पिस्तूल आणि त्याचे काडतुसे आणतात. त्यानंतर इथे मोठ्या किमतींवर त्याची विक्री करतात. पुण्यात आज पकडलेल्या ७ पिस्तूलची किंमत जरी २ लाख ८६ हजार असेल, तर ती मुख्य आरोपीने इतरांना कितीला विकली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com