Saif Ali Khan Attack Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Attack Update : नेशनल पैलवान ते सैफचा हल्लेखोर; सैफ अली खान हल्लाप्रकरणात आरोपीचा धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan: सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद इलियास शरीफुल इस्लाम शहजाद याची मुंबई पोलिस चौकशी करत आहेत. तो ५ दिवसांच्या रिमांडवर आहे. यावेळी, हल्लेखोर सतत नवीन आणि धक्कादायक खुलासे करत आहे.

Shruti Vilas Kadam

Saif Ali Khan Attack Update : सैफ अली खानवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या शहजादबद्दल नवीन खुलासे होत आहेत. आरोपीने पोलिसांना सांगितले की तो बांगलादेशात कुस्तीपटू आहे. आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याने जिल्हा तसेच राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळली आहे. आरोपी शहजादने पोलिसांना सांगितले की तो बांगलादेशात कुस्तीपटू होता आणि कमी वजनाच्या गटात कुस्ती खेळायचा. आरोपी जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती खेळाला आहे. कुस्तीपटू असल्याने तो सैफ अली खानवर हल्ला करण्यात यशस्वी झाला.

आरोपी शहजादबाबत मुंबई गुन्हे शाखेने असेही म्हटले आहे की, सैफवरील हल्ल्यानंतर त्याने ३ ते ४ वेळा कपडे बदलले होते. गुन्हा केल्यानंतर आरोपी सतत इकडे तिकडे फिरत होता. तो वांद्रे स्टेशनला गेला. तिथून मी दादर, वरळी, अंधेरी आणि नंतर ठाणे येथे गेलो. गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, आरोपी शहजाद गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बांगलादेशमधून घुसखोरी करून मुंबईत आला होता.

चौकशीदरम्यान, हे देखील उघड झाले की आरोपी मोहम्मद शहजादने सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती. आरोपी रिक्षाचालकाकडून सेलिब्रिटींच्या घरांची माहिती घेत असे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी रिक्षाचालकाकडून वांद्रे परिसरात राहणाऱ्या सेलिब्रिटींच्या घरांची माहिती मिळवली होती.

आरोपी शहजादने अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी

शाहरुख खान आणि सैफ अली व्यतिरिक्त, आरोपींनी इतर अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती. रविवारी सकाळी ठाणे शहरातून पोलिसांनी ३० वर्षीय आरोपी शहजादला अटक केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ठाण्यातील कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटजवळ शहजादला अटक करण्यात आली, पोलिसांनी शहजादला ठाण्यातील जंगली भागातील एका कामगार छावणीत शोधून काढले. हा गुन्हा करण्याच्या काही दिवस आदी शहजाद विजयो या नावाने बांधकाम मजूर म्ह्णून काम करत होता. त्याने बार वेटर, वेठबिगारी, हाऊसकिपींग अशी कामे मुंबईत राहून केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "शहरात सात तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याला अटक करण्यात आली." न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

SCROLL FOR NEXT