Sachin Pilgaonkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Sachin Pilgaonkar Viral Video : अभिनेते सचिन पिळगावकर पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सचिन पिळगावकर हे उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक आहे.

सचिन पिळगावकर सध्या आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहे.

सचिन पिळगावकर यांनी राजकुमार बड़जात्या यांच्या बद्दल एक किस्सा सांगितला आहे.

लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी सांगितलेले किस्से सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर सचिन पिळगावकर यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ते थेट राजकुमार बड़जात्या यांच्या विषयी बोलताना दिसत आहेत. सचिन पिळगावकर व्हिडीओत सांगताना दिसतात की, ज्येष्ठ निर्माते राजकुमार बडजात्या यांनी माझे गाणे ऐकले आणि अखेरचा श्वास घेतला.

व्हायरल व्हिडीओत सचिन पिळगावकर म्हणतात की, "राजकुमार बडजात्या यांची तब्येत बिघडली होती. ते त्यांच्या नातवासोबत होते. तेव्हा नातवाने राजकुमार यांना विचारले की तुमची इच्छा काय आहे. त्यावर राजकुमार म्हणाले की, मला सचिनचे 'शाम तेरी बंसी पुकारे राधा नाम' हे गाणे पाहायचे आहे. मला सचिनला पाहायचे आहे. त्यानंतर त्यांनी गाणी पाहिले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात गेल्यावर त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले. " हा किस्सा सांगताना सचिन पिळगावकर व्हिडीओत दिसत आहेत.

सचिन पिळगावकरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा सचिन पिळगावकर यांना ट्रोल केले जात आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. कमेंटमध्ये एक युजर म्हणतो की, "हा माणूस नेहमी अशा लोकांबद्दल बोलतो की जे हयात नाहीत. हयात व्यक्तींच्या सहसा नादी लागत नाही हा..." तर दुसरीकडे काही लोक सचिन पिळगावकरची बाजू घेऊन बोलताना दिसत आहेत.

आजवर सचिन पिळगावकर यांनी खूप सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. त्यांनी शोले, बालिका बधू, आणि नदिया के पार, गीत गाता चल, सत्ता पे सत्ता आणि प्रेम दिवाने अशा अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवा बनवी, आमच्यासारखे आमच्या, नवरा माझा नवसाचा, कुंकू , शर्यत हे गाजलेले मराठी चित्रपट केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई महापालिका निवडणुकीत PADU मशिन, आयोगाच्या नव्या मशीनवर ठाकरेंचा आक्षेप, PADU मशीन नेमकं कशासाठी?

Maharashtra Live News Update: नागपुरात चंद्रपुरात जाणारी दारुची गाडी पकडली

Haldi Kumkum affordable gift: स्वस्तात मस्त...अगदी १० रूपयांपासून हळदी-कुंकुच्या वाणामध्ये देऊ शकता या गोष्टी

शिंदेंच्या शिवसेना उमेदवारानं मंडळाच्या तरुणांना मारहाण केल्याचा आरोप; पोलिसांशीही घातली हुज्जत

अंत्यविधीवरून परतताना काळाचा घाला; अपघातात एकाच कुटुंबातील ६ महिलांचा मृत्यू, मकरसंक्रातीच्या दिवशी गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT