Ravi Jadhav : दिवाळीच्या मुहूर्तावर रवी जाधव यांनी दिलं मोठं सरप्राइज; नवीन चित्रपटाची घोषणा, रिलीज डेट काय?

Ravi Jadhav New Movie : 'नटरंग' चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे नाव आणि रिलीज डेट जाणून घेऊयात.
Ravi Jadhav New Movie
Ravi JadhavSAAM TV
Published On
Summary

दिग्दर्शक रवी जाधव यांचा 'नटरंग' चित्रपट खूप गाजला.

रवी जाधव यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी आजवर अनेक हिट चित्रपट केले आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रवी जाधव यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. रवी जाधव यांचा 'नटरंग' चित्रपट सुपरहिट झाला. आता त्याच पार्श्वभूमीवर आणखी एक चित्रपट ते घेऊन येत आहेत. त्यांचा नवीन चित्रपट देखील 'तमाशा' या लोककला प्रकारावर आधारित असणार आहे.

रवी जाधव पोस्ट

"गोष्ट २००९ सालाची

फड लावणीच्या तमाशाची

झाली 'नटरंग' गुणाची

आता पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा...

रवी जाधव आणि झी स्टुडिओज्

खेळ रंगवतायेत,

गोष्ट संगीतबारीची,

भरजरी लावणीची!

'फुलवरा'

'संगीतबारीच्या वाटा बारा'

'भवानी आईचा आशिर्वाद घ्या, आनं लावणीला बळ द्या'"

चित्रपटाचे नाव अन् रिलीज डेट काय?

रवी जाधवच्या नवीन चित्रपटाचे नाव 'फुलवरा' असे आहे. हा चित्रपट 2026 च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवी जाधव यांच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. 'फुलवरा' चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांची आहे.

नटरंग चित्रपट

2009 साली रिलीज झालेला 'नटरंग' सिनेमा लावणी आणि तमाशा यावर आधारित होता. या चित्रपट लोकप्रिय कलाकार पाहायला मिळाले. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते. त्यासोबतच चित्रपटात किशोर कदम, प्रिया बेर्डे, अमृता खानविलकर, विभावरी देशपांडे, राजेश भोसले, मिलिंद शिंदे, गणेश रेवडेकर आणि किशोर चौगुले असे अनेक कलाकार होते. 'नटरंग' चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातील 'वाजले की बारा' आणि 'अप्सरा आली' हे गाणे खूप गाजले.

Ravi Jadhav New Movie
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com