Ravi Jadhav: रणदीप हुड्डाला सलाम! 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबाबत रवी जाधव यांची पोस्ट चर्चेत

Ravi Jadhav On Swatantrya Veer Savarkar Film: 'स्वातंत्रवीर सावरकर' या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्याने स्वातंत्र्यवीर सावरकारांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.
Ravi Jadhav On Swatantrya Veer Savarkar Film
Ravi Jadhav On Swatantrya Veer Savarkar FilmSaam Tv

Swatantrya Veer Savarkar Film:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) स्टारर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाला (Swatantrya Veer Savarkar Movie) प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आज ५ दिवस झाले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट संथगतीने कमाई करताना दिसत आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. मराठमोळे अभिनेता आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी नुकताच या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

रवी जाधव यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'प्रत्येकाने आवर्जून पहावा असा चित्रपट!!! रणदीप हुड्डाला सलाम! उत्तम अभिनय, छायाचित्रण, संकलन, VFX, पार्श्वसंगीत!!! हजारो अडचणींवर मात करुन रणदीपने जिद्दीने ३ वर्ष मेहनत करुन हा प्रेरणादायी चित्रपट पूर्ण केला. आपण केवळ ३ तास वेळ देऊन तो नक्कीच चित्रपटगृहात पाहून प्रेरणा घेऊ शकतो. सावरकरांना वंदन करु शकतो.' या पोस्टद्वारे त्यांनी चित्रपटासोबत रणदीप हुड्डाच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. त्याचोसबत त्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

रवी जाधव यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, 'तुमच्या सारख्या आघाडीच्या मराठी दिग्दर्शकाने सावरकर आणि त्यांच्यावरील चित्रपटाचे कौतुक केलेले पाहून तुमच्या विषयीचा आदर अजून वाढला आहे.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'धन्यवाद दादा, प्रमोट करण्यासाठी. फार मोजक्या 'मराठी' कलाकारांनी या चित्रपटाबद्दल प्रमोशन केलं आहे. तुम्ही त्यापैकी एक.' तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'खूप छान सर आपल्या सावरकरांच्या चित्रपटास सपोर्ट केल्या बद्दल... हीच अपेक्षा संपूर्ण मराठी इंडस्ट्री कडून आहे.'

Ravi Jadhav On Swatantrya Veer Savarkar Film
Ram Charan Birthday: राम चरणच्या नावामागे आहे रंजक कथा, 'नाटू-नाटू' गाण्यासाठी मिळालाय ऑस्कर अवॉर्ड

दरम्यान, 'स्वातंत्रवीर सावरकर' या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्याने स्वातंत्र्यवीर सावरकारांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अंकिता लोखंडे बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तिने या चित्रपटामध्ये सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २२ मार्चला रिलीज झाला. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डाने अभिनयासोबत दिग्दर्शनाची जबाबदारी देखील स्वीकारली आहे. त्याचसोबत या चित्रपटाचा सह-लेखन आणि सह-निर्मिती देखील त्याने केली आहे. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने खूपच मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी त्याला प्रचंड बॉडी ट्रान्सफॉर्मेशनही करावं लागलं होतं.

Ravi Jadhav On Swatantrya Veer Savarkar Film
Swarda Thigale Wedding: 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' फेम स्वरदा ठिगळे अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com