Sa Re Ga Ma Pa 2023 Winner Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Sa Re Ga Ma Pa 2023 Winner: 'सा रे ग म प 2023'च्या ट्रॉफिवर अल्बर्ट लेप्चाने कोरलं नाव, पत्नीला दिलं विजयाचं श्रेय

Albert Kabo Lepcha Win Sa Re Ga Ma Pa 2023 Trophy: निष्ठा शर्माने प्रथम आणि रनिता बॅनर्जीने द्वितीय उपविजेती स्थान मिळवलं. सध्या या सर्व विजेता स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Priya More

Sa Re Ga Ma Pa 2023:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'सा रे ग म प 2023' (Sa Re Ga Ma Pa 2023) ला यावर्षी देखील प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. नुकताच या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. अल्बर्ट लेप्चा (Albert Lepcha) या स्पर्धकाने 'सा रे ग म प 2023'च्या ट्रॉफिवर आपलं नाव कोरलं. तर निष्ठा शर्माने प्रथम आणि रनिता बॅनर्जीने द्वितीय उपविजेती स्थान मिळवलं. सध्या या सर्व विजेता स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'सा रे ग म प 2023'च्या ग्रँड फिनालेमध्ये रानिता बॅनर्जी, अल्बर्ट लेप्चा, सोनिया गॅम्जर, स्नेहा भट्टाचार्ज आणि निष्ठा शर्मा यांनी आपल्या मधूर आवजामध्ये परफॉर्मन्स केला. यावेळी देखील त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या शोच्या ग्रँड फिनालेला बॉलिवूड अभिनेता गोविंदा, त्याची पत्नी सुनीता आहूजा आणि अभिनेत्री अरुणा इराणीने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदाचा 'सा रे ग म प 2023' हा शो खूपच जबरदस्त होता. यंदाच्या सीझनमध्ये हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya), नीती मोहन (Neeti Mohan) आणि अनु मलिक (Anu Malik) हे जजच्या भूमिकेत होते. रानिता बनर्जी, अल्बर्ट लेप्चा, सोनिया गॅम्जर, स्नेहा भट्टाचार्य आणि निष्ठा शर्मा हे स्पर्धक या सीझनच्या अंतिम टप्प्यात पोहचले होते. या सर्व स्पर्धकांमध्ये शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पण अखेर अल्बर्ट लेप्चा या शोची ट्रॉफी जिंकली.

२७ वर्षांचा अल्बर्ट लेप्चा हा पश्चिम बंगालच्या कलिम्पोंग येथे राहणारा आहे. तो सध्या कोलकातामध्ये राहतो. अल्बर्ट लेप्चानेने 'सा रे ग म प 2023'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर ईटाइम्सशी संवाद साधला. यावेळी त्याने ही ट्रॉफी जिंकण्याचे सर्व श्रेय आपल्या पत्नीला दिलं आहे.

त्याने सांगितले की, 'हा शो जिंकल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. इतर सर्व स्पर्धक या ट्रॉफीसाठी तितकेच पात्र होते. ते देखील तितकेच टॅलेंटेड आहेत. जेव्हा मी पहिल्यांदा या शोमध्ये सहभागी झालो तेव्हा मला कधीच वाटले नव्हते की मी ट्रॉफी जिंकेल.'

तसंच 'माझं संपूर्ण कुटुंब खुश आहेत. माझ्या पत्नीने या पूर्ण प्रवासामध्ये मला साथ दिली. माझी पत्नी माझी ताकद आहे. तिच होती जिची इच्छा होती की मी या शोमध्ये असायला पाहिजे. त्यामुळे आता मी हा शो जिंकलो. हे तिच्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.' दरम्यान, सध्या अल्बर्टवर सर्वस्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT