S S David Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

S S David Death : सिनेसृष्टीत खळबळ, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

S S David Passes Away : प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. डेव्हिड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 55 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. डेव्हिड यांचे निधन झाले आहे.

एस. एस. डेव्हिड यांनी वयाच्या 55 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

एस. एस. डेव्हिड यांना हृदयविकाराचा झटका आला.

मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. लोकप्रिय दिग्दर्शकाचे निधन झाले आहे. कन्नड चित्रपट निर्माते एस. एस. डेव्हिड (S S David Death) यांनी वयाच्या 55व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. एस. एस. डेव्हिड यांचे बंगळुरूमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, 31 ऑगस्टला संध्याकाळी एस. एस. डेव्हिड यांना हृदयविकाराचा झटका आला. हार्ट अटॅक येताच ते जमिनवर कोसळले.

मीडिया रिपोर्टनुसार, 31 ऑगस्टला संध्याकाळी 7.30च्या सुमारास एस. एस. डेव्हिड फार्मसीमध्ये बेशुद्ध झाले आणि खाली कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले. एस. एस. डेव्हिड यांना बंगळुरू येथील आर.आर. नगर येथील एस.एस. रुग्णालयात दाखल केले.

एस. एस. डेव्हिड यांच्या बहिणीने त्यांच्या पार्थिवावर स्थानिक पातळीवर अंतिम संस्कार करण्याचीही विनंती केली. मिळालेल्या माहितीनुसार, एस. एस. डेव्हिड यांचा मृतदेह व्हिक्टोरिया रुग्णालयात हलवण्यात आला आहे.

कारकीर्द

एस. एस. डेव्हिड यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. त्यांनी पटकथा लेखन केले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील एस. एस. डेव्हिड हे मोठे नाव आहे. त्यांचे चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान आहे. त्यांनी 'जयहिंद', 'हे बँगलोर' आणि 'धैर्य' चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. एस. एस. डेव्हिड हे एक उत्तम लेखक देखील होते.

1990 च्या दशकात एस. एस. डेव्हिड यांटे पटकथा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मोलाचा वाटा आहे. लेखक म्हणून एस. एस. डेव्हिड हे 'पोलिस स्टोरी'साठी प्रसिद्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Long Sleeves Blouse Design: मॉडर्न अन् स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा हे 'फुल स्लिव्ह ब्लाऊज'

Shocking : अरे देवा! गाडीवरून आले, आजूबाजूला पाहिलं; नंतर हळूच सिलिंडर चोरून पळ काढला

Maharashtra Live News Update: बीडमध्ये पूरस्थिती हिंगणी हवेलीत नऊ नागरिक पाण्यात अडकले

savalyachi janu savali: मेहेंदळे कुटुंबाच्या व्यवसायातून तिलोत्तमा या व्यक्तीला करणार बेदखल? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट

Hero चा धमका! लाँच केली Activaहून स्वस्त स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही

SCROLL FOR NEXT