IFFI Awards Logo Saam TV
मनोरंजन बातम्या

IFFI Awards: दाक्षिणात्य चित्रपटाची जादू परदेशातही, 'RRR'ची इफ्फीमध्ये फिचर फिल्मसाठी निवड

'आरआरआर' चित्रपट नुकताच जपानमध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

IFFI Awards: भारतीय चित्रपटांचे चाहते हे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहेत. जगभरातील अनेक चित्रपटप्रेमी भारतीय चित्रपट मोठ्या आवडीने पाहतात. थिएटरसोबत ओटीटीवर ही प्रेक्षक चित्रपट पाहण्याचा अधिक कल आहे. दाक्षिणात्य चित्रपटाची भूरळ ही फक्त भारतातच नाही तर परदेशातही दिसत आहे.

दाक्षिणात्य चित्रपट 'आरआरआर'ची टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त जपानमध्ये गेले आहेत. जपानच्या नागरिकांनी त्यांचे स्वागत मोठ्या थाटामाटात केले. त्यांच्या स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

'आरआरआर' चित्रपट नुकताच जपानमध्ये प्रदर्शित झाला आहे. एका इंग्लिश वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. प्रभासच्या साहोने ९० लाखांची एका दिवसात कमाई केली आहे. या विकेंडला चित्रपटाची एकूण कमाई ३.५ कोटींहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.

प्रेक्षकांनी चित्रपट पाहता लगेच सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे. चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून चित्रपटाचे कौतूक होत आहे. “‘आरआरआर’ हा या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे…नक्की पहा!”, “या चित्रपटाची कथा, कथेची मांडणी, संवाद, नातू गाणे हे सगळेच उत्कृष्ट आहे.” असे कमेंट्स प्रेक्षकांनी केले आहेत.

या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. एसएस राजामौली दिग्दर्शित ऑस्कर 2023 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड न झाल्याने RRR चित्रपटाच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) ने शनिवारी 2022 या वर्षासाठी 'भारतीय पॅनोरमा' विभागासाठी पुरस्कार जाहीर केला आहे. या कार्यक्रमादरम्यान एकूण 25 फीचर फिल्म आणि 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवल्या जातील. यामध्ये आरआरआरचाही समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

Raj Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांच्या जागी मी असतो तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले,VIDEO

Ranveer Singh: रणवीर सिंह निभावतोय डॅडी ड्युटीज; आनंद व्यक्त करताना अभिनेत्याला शब्द सुचेना

SCROLL FOR NEXT