Bigg Boss 16: प्रियांका आणि अंकितचं नाते बहरत आहे, पाहा एकतर्फी प्रेमाचे नवे पैलू

हिंदी 'बिग बॉस 16' नेहमीच चर्चेत असतो. घरातील काही स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. त्यातील एक म्हणजे प्रियांका आणि अंकितची जोडी.
Priyank Nad Ankit
Priyank Nad AnkitSaam Tv

Bigg Boss 16 Episode Update: 'बिग बॉस 16' मधील नात्यांचे रूप प्रत्येक दिवशी बदलताना दिसते. ज्याच्या हाती सत्ता जाते त्याच्या मागे बाकीचे स्पर्धक सुद्धा जातात. काल 'वीकेंड का वार' पार पडला. यावेळी करण जोहरने हा एपिसोड होस्ट केला होता.

सलमान खानची तब्येत ठीक नसल्याने या आठवड्यात करण जोहर 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार आहे. काल रात्री करण जोहर थेट घरामध्ये गेलेला दिसला. तसेच त्याने घरातील सदस्यांसोबत खूप मजामस्ती सुद्धा केली. काल कुटुंबातील काही सदस्यांची त्याने शाळा घेतली.

Priyank Nad Ankit
Drishyam 2 Controversy: 'दृश्यम 2'च्या अडचणीत वाढ, निर्मात्यांना सहन करावे लागणार नुकसान

'वीकेंड का वार'मध्ये करण जोहर दिवाळी मूडमध्ये दिसत होता. त्याने घरातील सदस्यांच्या नात्यावर भाष्य केले. त्याने त्याच्या चित्रपटातील काही डायलॉग म्हणत सदस्यांवर निशाणा साधला. सदस्यांना त्याने चित्रपटातील पात्रांची नावे सुद्धा दिली आणि त्यांच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेतले. (Bigg Boss)

प्रियांका आणि अंकित यांच्या नावाचा या आठवड्यात बोलबाला होता. प्रियांका सुरुवातीपासूनच तिचे अंकितवरील प्रेम व्यक्त करताना दिसली आहे. ती नेहमीच त्यांच्या मैत्रीविषयी बोलत असते. परंतु अंकित या सगळ्यापासून दूर राहणे पसंत करायचा. मात्र काल करण जोहरच्या जाळ्यात तो पुरता अडकला आणि त्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

करणने प्रियंकाला तो जे बोलेल ते त्याच्यामागून म्हणायला सांगितले. त्यावेळी करण 'ए दिल है मुश्किल' मधील एकतर्फी प्रेमावरील डायलॉग म्हणाला आणि प्रियंकाला प्रश्न केला. त्याचे उत्तर प्रियांकाने न देतात अंकिताने दिले. तसेच त्याने त्याच्या मनातील भावना सर्वांसमोर बोलूनही दाखवल्या.

त्यानंतर करण जोहर (Karan Johar)कुटुंबातील सदस्यांसह कास्टिंग रोल हा खेळ खेळतो. या खेळात कारण, प्रियांकाला रणबीर आणि अंकितला अनुष्का शर्माची भूमिका साकारायला सांगतो. प्रियांका आणि अंकितला 'चन्ना मेरेया' गाण्यावर नाचण्यास सांगितले जाते. नाचत असताना अंकित त्याची ओढणी फेकतो आणि प्रियांकाला त्याच्या जवळ ओढतो. हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. प्रियांका आणि अंकितची केमिस्ट्री पाहून त्याचे चाहत्यांना नक्कीच आनंद होईल यात शंकाच नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com