Myra Vaikul What Jhumka Reel Shared Karan Johar Social Media Saam Tv
मनोरंजन बातम्या

Myra Vaikul What Jhumka Reel: छोट्या मायराच्या ‘व्हॉट झुमका’ची क्रेझ आता बॉलिवूडलाही, करण जोहरनं शेअर केला तो VIDEO

Myra Vaikul What Jhumka Viral Reel: ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर बालकलाकार मायरा वायकूळ अर्थात छोट्या मायराने या गाण्यावर खूप सुंदर व्हिडीओ बनवला आहे.

Chetan Bodke

Myra Vaikul What Jhumka Reel Shared Karan Johar Social Media: येत्या २८ जुलैला करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे. सध्या चित्रपटातील गाण्यांची सोशल मीडियावर एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत असून अनेक युजर्स चित्रपटातील गाण्यांवर सध्या रिल्स बनवत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यावर अनेक सेलिब्रिटी रिल्स बनवत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी सेलिब्रिटी देखील या गाण्यावर रिल्स बनवत आहे.

नुकताच या गाण्यावर सोशल मीडिया एन्फ्लूएंसर आणि बालकलाकार मायरा वायकूळ अर्थात छोट्या मायराने या गाण्यावर खूप सुंदर व्हिडीओ बनवला आहे. मायराच्या या व्हिडीओची भूरळ चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहराला देखील पडली आहे, खुद्द त्यानेच ही व्हिडीओ स्टोरीवर रिशेअर केली आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत बालकलाकार मायरा प्रमुख भूमिकेत होती. मायरासोबत मालिकेत प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडेसह अनेक मराठी सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत होते. त्या मालिकेत मायराने परीचे पात्र साकारले होते. मालिकेने प्रेक्षकांची जरी रजा घेतली असली, तरी मायराला प्रेक्षक छोटी परी म्हणूनच ओळखतात.

मायराला फार कमी वयात आणि अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली. तिचा सोशल मीडियावर चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे. मराठी बालकलाकारांमध्ये मायरा अग्रेसर असून तिचं नाव नेहमीच चर्चेत असतं.

नुकतंच मायराने सोशल मीडियावर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’मधील ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर एक रिल शेअर केला आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर असून सध्या तिच्या व्हिडीओची सर्वत्र तुफान चर्चा होत आहे. मायरा नेहमीच सोशल मीडियावर मराठी- हिंदी चित्रपटातील गाण्यांवर जबरदस्त आणि न चुकता व्हिडीओ शेअर करत असते. मायराच्या व्हिडीओ तिची आई सोशल मीडियावर तिच्या रिल्स शेअर करते.

शेअर केलेल्या व्हिडीओत मायराने, लाल टॉप, काळा लेहेंगा आणि ओढणी असा लूक केला आहे. या व्हिडीओत मायरा कमालीची क्यूट दिसत असून तिचा व्हिडीओ थेट चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहरने शेअर केला आहे. सोबतच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननेही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर रिल शेअर केली. मायरा सध्या कलर्स वाहिनीवरील ‘नीरजा- एक नई पहचान’ मालिकेत बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री स्नेहा वाघ सोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे.

गाण्याबद्दल बोलायचे तर, हे गाणे काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित झालं होतं. या गाण्यात आलिया- रणबीरने जबरदस्त डान्स केला असून त्यांची लव्ह- केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच भावली. हे गाणं निर्मात्यांनी ‘झुमका गिरा रे बरेली के बजार मे’ या जुन्या आयकॉनिक गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन आहे. प्रेक्षकांना हे गाणं फारच आवडले असून सोशल मीडियावर हे गाणं ट्रेंडिंगवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

SCROLL FOR NEXT