Urfi Javed Latest Video: ‘तुझ्या बापाचं काय जातंय?’ उर्फी काकांवर चांगलीच भडकली, व्हिडिओ तुफान व्हायरल

Urfi Javed Video: सध्या उर्फीचा एक ट्रीप दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ती एका व्यक्तीसोबत भांडतांना दिसते.
Urfi Javed Fight Video
Urfi Javed Fight VideoSaam Tv

Urfi Javed Latest Video:

आपल्या विचित्र फॅशनसाठी नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी अनेकदा कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली. बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धीमध्ये आलेली उर्फी अनेक मालिकेतूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विचित्र फॅशनसाठी चर्चेत राहिलेली उर्फी जर कधी चाहत्यांसमोर विचित्र फॅशन करून जर कधी आलीच तर तिची फॅशन पाहून नेटकरी डोक्यालाच हात लावतात. उर्फी जावेद स्वतःला ट्रेंडिंग गोष्टींपासून अजिबात मागे ठेवत नाही. आत्तापर्यंत उर्फी अनेक वस्तूंपासून ड्रेस तयार करुन फॅशन करतांना दिसते.

Urfi Javed Fight Video
Oppenheimer Controversy : 'ओपनहायमर'मधील भगवद्गीता वाचतानाचा सीन हटवणार? केंद्रीय मंत्र्यानेही निर्मात्यांना झापलेलं

उर्फी सध्या सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. नुकतंच उर्फीने गोव्याला जाऊन सुट्टीचा मनमुराद आनंद घेतला. तिचे रिसॉर्टवरील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, सध्या तिची गोव्याची ट्रीप सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. यावेळी तिने आपल्या चाहत्यांनाही फॅशनची झलक दाखवली होती. सध्या उर्फीचा एक ट्रीप दरम्यानचाच एक व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ती एका व्यक्तीसोबत भांडतांना दिसते. या व्हिडिओत तिच्यासोबत तिची बहीणदेखील दिसते. तिची बहिण त्या भांडणात मध्यस्थी करुन ते सोडवण्याचा प्रयत्न करते. (Bollywood Actress)

सध्या उर्फीचाहा भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक माणूस उर्फीला म्हणतो, अशी विचित्र कपडे भारतात चालत नाही. तू भारताचं नाव खराब करतेय. (Latest Marathi News)

तुझ्यामुळेच लोकं भारताला नावं ठेवत आहे. नंतर यावर उर्फीने देखील त्या व्यक्तीला चांगलेच सुनावले, त्यावर उर्फी म्हणते, तुझ्या बापाचं काय जातंय? तुम्ही तुमच्या कामाशीच तुमचं काम ठेवाना, मी तुमची मुलगी आहे का? असा टोला अभिनेत्रीने लगावला आहे. दोघांमधील वाद काही प्रमाणात वाढल्याने तिची बहीणदेखील त्या व्यक्तीला शांत राहण्यासाठी सांगते. (Trolled)

Urfi Javed Fight Video
तुम्ही ‘Oppenheimer’ पाहिलात का? भारतात अणुबॉम्बवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी किती केली कमाई?

उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिला नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी त्या व्यक्तीला पाठिंबा दर्शवला असून काहींनी त्या व्यक्तीला चांगलंच ट्रोल केलं आहे. महिलांनी काय परिधान करावं आणि कसे रहावे याचा निर्णय पुर्णपणे त्यांचा असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. (Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com