Oppenheimer Controversy : 'ओपनहायमर'मधील भगवद्गीता वाचतानाचा सीन हटवणार? केंद्रीय मंत्र्यानेही निर्मात्यांना झापलेलं

Minister Anurag Thakur On oppenheimer : अनुराग ठाकूर यांनी फिल्म सर्टिफिकेशन बोर्डची कान उघाडणी केली आहे.
Anurag Thakur On Oppenheimer
Anurag Thakur On OppenheimerSaam TV
Published On

Union Minister Anurag Thakur Slam CBFC : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी खिस्तोफर नोलानच्या 'ओपनहायमर' चित्रपटातील एका सिंवर नाराजी व्यक्त केली आहे. या सीनमध्ये असलेल्या अभिनेता सिलिअन मुरफी शरीरसंबंधांवेळी भगवदगीतेचे पठण करता असल्याचे दाखविण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुराग ठाकूर यांनी फिल्म सर्टिफिकेशन बोर्डची कान उघाडणी केली आहे. तसेच चित्रपटातील हे सीन काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

Anurag Thakur On Oppenheimer
‘Rocky Aur Rani Ki Prem Kahani’चा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात; रणबीर सिंगच्या कृत्याने करण जोहर अडचणीत; नेमकं काय घडलं? वाचा

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, 'असा सीन चित्रपटामध्ये दाखवलेच कसा गेले?' तसेच याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते असेही सूत्रांनी दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. (Latest Entertainment News)

'ओपनहायमर' चित्रपटामधील पात्र सिलिअन मर्फी मानसशात्रज्ञ जीन टॅटलर शारिरीकरित्या जवळ येताना दाखविण्यात आले आहेत. यादरम्यान टॅटलर, मर्फीला समोर ठेवलेल्या संस्कृत पुस्तकातील श्लोक वाचायला सांगते. तर ते पुस्तक कोणते आहे हे सीनमध्ये दाखविण्यात आलेलं नाही.

टॅटलरने सांगिल्यानंतर संभ्रमात असलेला 'ओपनहायमर' श्लोक वाचायला सुरुवात करतो आणि म्हणतो, आता मी एक मृत आहे, जगाचा विनाशक आहे.

जगातील पहिला अनु बॉम्ब बनवणारे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. परंतु चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

या चित्रपटामध्ये भगवत गीतेतील काही शोक वापरण्यात आले आहेत. ते काढून टाकावे अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी करत आहेत.

"मला नुकतेच कळले की या चित्रपटामध्ये भगवत गीतेतील एका श्लोकाचा समावेश एका अत्यंत आक्षेपार्ह सीनदरम्यान करण्यात आला आहे. मी इथे त्याची पुनरावृत्ती करणार नाही. हिंदू धर्माचे सकारात्मक आणि अचूक चित्रण करण्यासाठी हॉलीवूड आणि पाश्चिमात्यांवर कधीही विश्वास ठेवू नका" असे एका नेटकाऱ्याने म्हटले आहे.

Anurag Thakur On Oppenheimer
Kangana Ranaut On Kissing Controvery: 'रिव्हॉल्व्हर रानी'तील 'त्या' सीनवर कंगना रनौतचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘हृतिक रोशननंतर...'

"ओपेनहायमर चित्रपटात भगवद्गीतेचा उल्लेख केल्याने हिंदू आनंद साजरा करत आहेत, परंतु हॉलीवूडने गीतेचा केलेला निंदनीय अपमान पाहून ते संतप्त झाले असून गोंधळून गेले आहेत. शरीरसंबंधांवेळी पवित्र श्लोकांचा उल्लेख करणे अनादर आणि वर्णद्वेषी मानले जाते. #BoycottOpenheimer" तर दुसऱ्या नेटकाऱ्याने अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पीटीआयच्या अहवालानुसार, स्टुडिओ युनिव्हर्सल पिक्चर्सने काही सीन्स काढून टाकल्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने चित्रपटाला U/A रेटिंग दिले, ज्यामुळे तो 13 वर्षांवरील प्रेक्षक देखील हा चित्रपट बघतील. चित्रपटातील आणखी एक सीन काढल्याने चित्रपटाचे ड्युरेशन कमी होत असल्याचे खंत व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com