Nuclear Test Movies In Bollywood
Nuclear Test Movies In BollywoodSaam Tv

तुम्ही ‘Oppenheimer’ पाहिलात का? भारतात अणुबॉम्बवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी किती केली कमाई?

Oppenheimer Film: ‘ओपनहायमर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अणूबॉम्ब विषयी बॉक्स ऑफिसवर कोण- कोणते चित्रपट प्रदर्शित झाले होते, जाणून घेऊया त्यांच्या कमाई विषयी
Published on

Nuclear Test Movies In Bollywood: सध्या भारतात ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) या चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे. अवघ्या काही दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली असून भारतात या चित्रपटाला बराच मोठा चाहतावर्ग लाभला आहे. या चित्रपटाने भारतात ३ दिवसातच ५० कोटींची भारतात कमाई केली आहे. या चित्रपटाआधी देखील अणूबॉम्ब विषयी चित्रपट प्रदर्शित झाले होते, त्यांनी बॉक्स ऑफिसवर कशी कमाई केली आहे, एक नजर टाकूया...

Nuclear Test Movies In Bollywood
Dhindora Baje Re Song Out : भव्य सेट, सुंदर डान्स; आलिया - रणवीरच्या जबरदस्त 'ढिंढोरा बाजे रे' गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मने

जॉन अब्राहम नेहमीच आपल्या अभिनयातून चाहत्यांना प्रभावित करतो. जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘परमाणू’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटाचे एकूण बजेट ३५ कोटी इतके असून त्याने बॉक्स ऑफिसवर ६५ कोटींची कमाई करत हिट चित्रपटांच्या यादीत आपले स्थान पक्के केले.

2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिशन मजनू’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा सत्य घटनांवर आधारित असून चित्रपटाची कथा ७० च्या दशकातील भारत- पाकिस्तानमधील संबंध दाखवण्यात आले. चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपटाचे बजेट जवळपास ५० कोटी होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २९ कोटींच्या आसपास कमाई केली होती. चित्रपटाची कमाई पाहता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला.

Nuclear Test Movies In Bollywood
Kangana Ranaut On Kissing Controvery: 'रिव्हॉल्व्हर रानी'तील 'त्या' सीनवर कंगना रनौतचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘हृतिक रोशननंतर...'

‘१६ डिसेंबर’ हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे कट कारस्थान थोपवण्याची धडपड दाखवण्यात आली आहे. हा एक मल्टिस्टारर चित्रपट असून अनेक प्रसिद्ध कलाकारांनी या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत डॅनी डेन्झोंगप्पा, मिलिंद सोमण, सुशांत सिंग आणि गुलशन ग्रोव्हरसारखे कलाकार होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश दाखवू शकला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com