Shweta Shinde Big Theft Took Satara House Instagram
मनोरंजन बातम्या

Robbery At Shweta Shinde Home : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरात चोरी, १० तोळे सोन्यावर चोरट्यांनी मारला डल्ला

Shweta Shinde Big Theft Took Satara House : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरावर मोठा दरोडा टाकण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

Chetan Bodke

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. अभिनेत्रीच्या सातारा शहरातील पिरवाडी परिसरात असलेल्या घरावर चोरट्यांनी चोरी केलेली आहे. या घरामध्ये अभिनेत्री आपल्या आईसोबत राहते. पण सध्या मालिकेच्या शुटिंगमुळे श्वेता मुंबईमध्ये होती. चोरी झाली तेव्हा घरी कोणीही नव्हते, त्यामुळे तिच्या घरातले व्यक्ती सुखरूप आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या घरी चोरट्यांनी १० तोळे सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम चोरले असून चोरट्यांनी श्वेताच्या घरातील कपाट सुद्धा जाळलं आहे. कपाट जाळल्यानंतर त्यांनी दागिने लंपास केले आहे. अभिनेत्रीच्या घरी चोरी झाल्यानंतर पिरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर अभिनेत्रीने तात्काळ पोलिसांत धाव घेत एफआयआर नोंदवली आहे. यावेळी अभिनेत्रीने पोलिस लवकरात लवकर चोरांचा शोध घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

अभिनेत्रीने काल सातारा पोलिसांकडे घटनेची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर तिने माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी अभिनेत्री म्हणाली, "३ जूनला (सोमवारी) रात्री माझ्या सातारच्या घरी काही चोरट्यांनी दरोडा टाकला. झालेल्या चोरीप्रकरणी मी पोलिसांत तक्रार दाखल करायला आले आहे. माझ्या घरातून चोरांनी १० तोळं सोनं आणि पैसे चोरले आहेत. पण एकूण किती मालमत्ता चोरीला गेलीये हे माहित नाहीये. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी आई घरात नव्हती म्हणून ती सुखरूप बचावली आहे."

पुढे श्वेता शिंदेने सांगितले की, "नेमकं घरात काय काय चोरीला गेलं आहे, याची कल्पना नाही. जितकं आईच्या लक्षात आलं तितकं तिने मला सांगितले आहे. मी नुकतीच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी पोलिस तपास करीत आहेत. मला विश्वास आहेत, ते नक्कीच लवकरात लवकर चोरांचा शोध घेतील."

श्वेता एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती काही मराठी मालिकेची निर्मातीही आहे. सध्या अभिनयापासून दूर राहून श्वेता निर्मिती क्षेत्रात काम करत आहे. सध्या तिची झी मराठीवर 'अप्पी आमची कलेक्टर' ही सिरीयल टेलिकास्ट होत आहे. लवकरच झी मराठीवरच 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT