Ekta Kapoor Birthday : वडिलांच्या एका अटीमुळे अविवाहित राहिली एकता कपूर, लग्न न करण्याचं 'हे' आहे कारण

Ekta Kapoor Why Single : कायमच आपल्या टेलिव्हिजन सिरियलमुळे चर्चेत राहणारी एकता अनेकदा खासगी आयुष्यातही चर्चेत आली आहे. तिचं आज ४८ वय असलं तरीही ती ‘सिंगल मदर’ आहे.
Ekta Kapoor Birthday : वडिलांच्या एका अटीमुळे अविवाहित राहिली एकता कपूर, लग्न न करण्याचं 'हे' आहे कारण
Ekta Kapoor Why SingleSaam Tv

बॉलिवूडमधील प्रसिद्धी निर्माती आणि टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर आज (७ जून) तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी आणि तुषार कपूरची बहीण आहे. 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर की', 'क्योंकि सांस भी कभी बहू थी', 'नागिन' यांसारख्या अनेक सीरियल्सची निर्मिती एकता कपूर हिने केली आहे.

कायमच आपल्या टेलिव्हिजन सिरियलमुळे चर्चेत राहणारी एकता अनेकदा खासगी आयुष्यातही चर्चेत आली आहे. तिचं आज ४८ वय असलं तरीही ती ‘सिंगल मदर’ आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एकताने एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये तिन आपल्या वडिलांना अर्थात जितेंद्र कपुर यांना सिंगलसाठी जबाबदार ठरवलं आहे.

Ekta Kapoor Birthday : वडिलांच्या एका अटीमुळे अविवाहित राहिली एकता कपूर, लग्न न करण्याचं 'हे' आहे कारण
Panchayat 3 Web Series: 'देखे हो बिनोद !' पंचायत' सीरीजमधील कुठे आहे फुलेरा गाव? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

एकदा एका मुलाखतीमध्ये एकताला तु लग्न केव्हा करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तिने उत्तर दिले की, "जेव्हा सलमान खान लग्न करेल, तेव्हा मी पण लग्न करेल" असं उत्तर दिलं. तर त्यासोबतच तिने लग्न झालं नाही, म्हणून तिच्या वडिलांनाही जबाबदार ठरवलं आहे. तिने तिच्या वडिलांच्या एका अटीमुळे लग्न केले नाही. तिच्या वडिलांनी तिला अट घातलेली की, "एकतर लग्न तरी कर किंवा काम तरी कर" तर तिने लग्नाची निवड न करता, कामाची निवड केली.

२०१९ मध्ये एकता सरोगसीच्या माध्यमातून आई झालेली आहे. तिने तिच्या मुलाचं नाव रवी ठेवलेलं आहे. खरं तर एकताच्या वडिलांचं खरं नाव रवी आहे. एकताचा ज्योतिष शास्त्रावर खूप विश्वास आहे. तिच्यामके, K हे अक्षर तिच्यासाठी लकी आहे. त्यामुळेच तिच्या अनेक मालिकांची नावे K पासून सुरू होतात. 'कभी सास भी बहू थी', 'कहानी घर-घर की', 'कही तो होगा', 'कसौटी जिंदगी की' अशा अनेक मालिकांच्या नावाची सुरवात K या अक्षरानेच झालेली आहे

Ekta Kapoor Birthday : वडिलांच्या एका अटीमुळे अविवाहित राहिली एकता कपूर, लग्न न करण्याचं 'हे' आहे कारण
Kangana Ranaut: CISF जवानाने कंगना रणौतच्या कानशिलात लगावली?, चंदीगड एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com