बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत कायमच कोणत्या ना कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगना रणौत मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली असून ती काल दिल्लीला जात होती. तेव्हा चंदीगड विमानतळावर CISF च्या महिला जवानाने कंगना रणौतच्या कानशिलात लगावली. त्या CISF च्या महिला जवानाला निलंबित करण्यात आले असून तिच्याविरोधात विमानतळ पोलिसांकडे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, त्या CISF च्या महिला कॉन्स्टेबल खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिला का कानाखाली मारली ?, त्या मागील कारण काय जाणून घेऊया...
४ वर्षांपूर्वी देशभरामध्ये कृषी कायद्याविरोधात देशभरातल्या अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. शेतकरी आंदोलनातील महिला शेतकऱ्यांसंदर्भात कंगना रणौतने एक वक्तव्य केले होते. तिने हे वक्तव्य ट्वीटरवर केलेले होते. ती म्हणाली होती की, "हा, हा, हा... ह्या त्याच आजी आहेत, ज्यांचा टाईम मॅगझीनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता. त्या सध्या शेतकरी आंदोलनासाठी १०० रुपये घेऊन उपलब्ध आहेत." अभिनेत्रीला या ट्वीटमुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिने ते ट्वीट डिलीट केले.
कंगनाच्या या वक्तव्यावर महिला CISF कॉन्स्टेबल चांगलीच भडकली होती. चंदीगड विमानतळावर कंगनासोबत झालेल्या गैरवर्तनाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती महिला CISF कॉन्स्टेबल कंगनाला म्हणते की, "शेतकरी आंदोलनात प्रत्येक महिला १०० रुपये घेऊन बसायच्या. त्याच्यामध्ये माझी आई पण तिथे होती." कंगनाने केलेल्या त्या विधानामुळे ती महिला CISF कॉन्स्टेबल प्रचंड संतापली होती. त्यामुळेच तिने तिच्या थेट कानशिलात ठेवून दिली होती.
या संपूर्ण घटनेनंतर कंगनाने X वर एक व्हिडीओ शेअर करत संपूर्ण घटनेची माहिती दिली. घटनेनंतर कंगनाने त्या महिला CISF कॉन्स्टेबलविरोधात विमानतळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर कुलविंदर कौर यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर अभिनेत्री कंगना रणौत दिल्लीसाठी रवाना झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही बातमी समोर येताच कंगणाचे चाहते संतप्त झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.