Riteish Deshmukh saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh : "लवकरच येत आहोत..." रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, रिलीज डेट काय?

Riteish Deshmukh-Raja Shivaji Movie : महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ लवकरच 'राजा शिवाजी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

Shreya Maskar

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट नवीन वर्षात रिलीज होणार आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार आणि महाराष्ट्राचा भाऊ रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या 'बिग बॉस मराठी 6' मुळे चांगला चर्चेत आहे. जानेवारी महिन्यापासून प्रेक्षकांचा आवडता शो 'बिग बॉस मराठी 6' सुरू होणार आहे, ज्याचे होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे. अशात आता रितेशने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रितेश देशमुख गेल्या काही काळापासून आपला आगामी चित्रपट 'राजा शिवाजी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होत. हा रितेश देशमुखच्या आयुष्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे चाहते देखील चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. अलिकडेच रितेशच्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल झाला होता. आता अखेर चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार झळकणार आहेत.

रितेश देशमुखची पोस्ट

"क्षणभर थांबलेला सूर्य..

मावळतीचा मावळ..

पण क्षणभरासाठीच…

उद्याच्या तेजस्वी पहाटे साठी"

१०० दिवसांची मेहनत, निष्ठा, समर्पण आणि अपार जिद्द यावर अखेर पडदा पडला. असंख्य आठवणी, असंख्य अनुभव आणि मनात कायम राहणारे क्षण. महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन घेऊन लवकरच येत आहोत !!!"

चित्रपटाची रिलीज डेट?

'राजा शिवाजी' चित्रपट नवीन वर्षात 2026 ला रिलीज होणार आहे. सिनेमा 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

चित्रपटातील गाण्यांना अजय-अतुलचे संगीत आहे. चित्रपटात रितेश देशमुखसोबत जिनिलीया देशमुख, संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते हे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Breakup Tips: पार्टनरला न दुखावता कसं कराल ब्रेकअप? या सोप्या टीप्स करतील तुमची मदत

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची 400 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री, रणवीर सिंह अन् अक्षय खन्नाची जोडी सुपरहिट

Maharashtra: वर्षभर शाळेतच नाहीत,७ शिक्षकांनी फुकटाचा पगार घेतला, महाराष्ट्रातील धक्कादायक वात्सव

Mobile WiFi: घराबाहेर पडताच मोबाइलचा वायफाय बंद करा, अन्यथा डोकं झोडून घ्यावं लागेल! कारण काय?

SCROLL FOR NEXT