Riteish-Raja Shivaji Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish-Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर सुसाट; रितेश भाऊंनी रविवारी केली छप्परफाड कमाई, रचला नवा इतिहास

Raja Shivaji Box Office Collection Day 3 : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने पहिल्या वीकेंडला छप्परफाड कमाई केली आहे. एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे रोज रिलीज झाला.

'राजा शिवाजी' चित्रपटाने मराठी आवृत्तीत सर्वात जास्त कमाई केली आहे.

'राजा शिवाजी' च्या रिलीज नंतर सर्वत्र रितेश भाऊंच्या दिग्दर्शनाचे कौतुक होत आहे.

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला ४० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात रितेश देशमुख आणि जिनिलिया एकत्र झळकले आहेत. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'राजा शिवाजी' या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते आणि जितेंद्र जोशी यांच्यासह कलाकार झळकले आहेत.

बॉक्स ऑफिसवर फक्त 'राजा शिवाजी' चा बोलबाला पाहायला मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यातजबरदस्त कामगिरी करत ब्लॉकबस्टर सुरुवात केली आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच भारतात ४०.३४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. लाडक्या भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ५,७७१ शोजमधून अंदाजे १२.०० कोटी रुपयांचे 'नेट' कलेक्शन केले आहे. चित्रपटाच्या एकूण कामगिरीमध्ये मराठी आवृत्तीने आपले वर्चस्व कायम राखले असून, तिने अंदाजे ७.७५ कोटी रुपये कमावले. तर हिंदी आवृत्तीनेही प्रगती दर्शवत ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाचे भारतातील एकूण नेट कलेक्शन ३३.९० कोटी रुपयांवर पोहोचले असून, एकूण ग्रॉस कलेक्शन ४०.३४ कोटी रुपयांवर गेले आहे.

'राजा शिवाजी'ने लय भारी'ला टाकले मागे

मराठी चित्रपटांमध्ये पहिल्या दिवशी आणि पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'राजा शिवाजी' ठरला आहे. पहिल्या दिवशी १३.५१ कोटी रुपये आणि पहिल्या तीन दिवसांत ३३.९० कोटी रुपयांची कमाई करत हा रेकॉर्ड बनवला आहे. या चित्रपटाने 'सैराट' आणि 'वेड' यांसारख्या यापूर्वीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. इतकेच नव्हे, तर २०१४ मध्ये ४० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या 'लय भारी' या चित्रपटाची एकूण (लाईफटाईम) कमाईही त्याने आतापर्यंतच ओलांडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT