Riteish - Raja Shivaji Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; रितेश भाऊ ठरला बॉक्स ऑफिसच किंग, वाचा कलेक्शन

Riteish Deshmukh Raja Shivaji Highest Grossing Marathi Movie : 'राजा शिवाजी' चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत मोलाचा कामगिरी केली आहे. रितेशच्या चित्रपटाने २५ दिवसांत छप्परफाड कमाई केली. एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' मराठीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला

'राजा शिवाजी'ची मराठी सिनेसृष्टीत मोलाचा कामगिरी

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत झळकला. या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारली असून सिनेमाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून रितेश आणि जिनिलिया हा महाराष्ट्राचे लाडकी जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली. जिनिलिया चित्रपटाची निर्माती असून तिने सिनेमात सईबाईंची भूमिका देखील साकारली आहे. चित्रपटाचे २५ दिवसांची एकूण कमाई, जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन

रितेश देशमुखने शेअर केलेल्या सोशल मिडिया पोस्टनुसार 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातील एकूण कमाई ₹१०१ कोटींच्या वर पोहचली आहे. 'राजा शिवाजी' सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात १२० कोटींहून अधिक कमाई करत इतिहास रचला. 'राजा शिवाजी' च्या कमाईने यशाचे शिखर गाठले. मीडिया रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपट १०० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे.

'राजा शिवाजी'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

  • 'राजा शिवाजी' मराठीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

  • मराठीतील सर्वाधिक ओपनिंग डेला कलेक्शन करणारा चित्रपट

  • मराठीतील सर्वाधिक ओपनिंग वीकेंड कमाई

टॉप 10 सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट

  • राजा शिवाजी - 101 कोटींपार कमाई

  • सैराट - 90 कोटी रुपये

  • बाईपण भारी देवा - 76.28 कोटी रुपये

  • वेड - 61.2 कोटी रुपये

  • नटसम्राट - 42 कोटी रुपये

  • पावनखिंड - 37.72 कोटी

  • लय भारी - 37 कोटी रुपये

  • कट्यार काळजात घुसली - 35 कोटी रुपये

  • ठाकरे - 31 कोटी रुपये

  • टाईमपास - 30 कोटी रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दौंडला भिमा नदीला आलेल्या पुरामुळे वीटभट्टांना पुराच्या पाण्याचा तडाखा

Vada Pav Recipe : पावसाची मजा दुप्पट होईल, घरीच बनवा मुंबई स्पेशल चटपटीत वडापाव

सासऱ्याचं घाणेरडं कृत्य! सुनेला जबरदस्ती दारू पाजली अन् नको के केलं; रेल्वे इंजिनिअरच्या काळ्या कृत्याने खळबळ

Kapoor Sisters: अंशुला कपूरच्या लग्नात 'कपूर सिस्टर्स'चा जलवा; जान्हवी, खुशी आणि सोनमचा ग्लॅमरस लूक व्हायरल

मुंबई-नांदेड प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नियमितपणे २ साप्ताहिक गाड्या सुरू, कुठे-कुठे असणार थांबा?

SCROLL FOR NEXT