Crime News : प्रसिद्ध मराठी गायकाकडून खंडणी वसूल, लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणाची दिली धमकी

Anand Shinde Extortion Case : प्रसिद्ध मराठी गायकाला लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणात अडकवून लाखोंची खंडणी मागण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकाराने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली.
Anand Shinde Extortion Case
Crime Newssaam tv
Published On

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी गायकाला लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणात अडकवून एका महिलेने त्याच्याकडून खंडणी वसूल केली असल्याचे प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

घडलेल्या प्रकरणाबद्दल मराठी गायक आनंद शिंदे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गायक आनंद शिंदे यांच्या संगीत कार्यक्रमात डान्स करणाऱ्या एका डान्सर महिलेने आनंद शिंदे यांना लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि खंडणी वसूल केली. खंडणीमध्ये डान्सरने ५० लाख रुपयांसोबत एका फ्लॅटची मागणी केली. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे.

Anand Shinde Extortion Case
Pravin Tarde : 'देऊळ बंद 2' चित्रपट बनवण्यामागचं मुख्य कारण आलं समोर, अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर प्रवीण तरडेंनी सर्वकाही सांगितले

आनंद शिंदे यांनी आरोपी महिला डान्सर, तिचा भाऊ आणि आईविरोधात डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, डिसेंबर 2023 पासून खंडणी उकळणे आणि छळवणुकीचा प्रकार केला जात आहे. तसेच गायकाने तक्रारीमध्ये सांगितले की, गायकाची आरोपी महिला आणि तिच्या आईशी पहिल्यांदा ओळख त्यांच्या घरी झाली. तेव्हा दोन्ही महिलांनी डान्सर म्हणून काम करण्याची संधी मागितली. त्यानंतर विविध कार्यक्रमात आरोपी महिलेची आनंद शिंदे यांच्यासोबत भेट झाली.

महिलेने पुणे येथे गायकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. तेव्हा आरोपी महिलेच्या कुटुंबाने आनंद शिंदे यांच्यासोबत संपर्क साधला, तक्रार मागे घेण्यासाठी पुण्यात एक फ्लॅट आणि ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर अनेक चर्चा करून ती रक्कम २५ लाख रुपये करण्यात आली. आरोपी महिलेने २० मे रोजी १ लाख रुपये घेतले आणि २२ मे रोजी २४ लाख रुपयांची मागणी केली. हे प्रकरण तपासासाठी ठाणे गुन्हे शाखेकडे (क्राइम ब्रांच) सोपवण्यात आले आहे.

Anand Shinde Extortion Case
Pravin Tarde : 'देऊळ बंद 2' चित्रपट बनवण्यामागचं मुख्य कारण आलं समोर, अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर प्रवीण तरडेंनी सर्वकाही सांगितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com