मोठी बातमी ! केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक, लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांची कारवाई

BJP Leader Bandi Sanjay Kumar’s Son Arrested : केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी साई भगीरथ याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BJP Leader Bandi Sanjay Kumar’s Son Arrested
Hyderabad Police arrested Union Minister Bandi Sanjay Kumar’s son Bandi Sai Bhagirathsaam tv
Published On
Summary
  • केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांच्या मुलाला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे.

  • बंदी साई भगीरथ याच्यावर पॉक्सो आणि लैंगिक शोषणाचे आरोप आहेत.

  • पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल.

केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी साई भगीरथ याला शनिवारी तेलंगणाच्या हैदराबादमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कुमार यांच्या मुलाविरोधात पीडित १७ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार केली होती. त्याआधारे ८ मे रोजी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात चौकशीसाठी भगीरथ पोलिसांसमोर शरण गेल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात त्याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. अटकेच्या कारवाईआधी केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी प्रतिक्रिया दिली होती. आपल्या मुलाला पोलिसांना शरण जाण्याचे आणि तपासात सहकार्य करण्यास सांगितले होते. गेल्या आठवड्यात तक्रार दाखल झाल्यानंतर मुलाला पोलीस तपासात सहकार्य करण्यास सांगितल्याचे ते म्हणाले होते.

BJP Leader Bandi Sanjay Kumar’s Son Arrested
धुळे हादरलं ! गळा दाबून महिलेला संपवलं; तरुणाचा मृतदेह गो-शाळेत लपवला,भोंदूबाबानं घडवलं दुहेरी हत्याकांड

नेमकं प्रकरण काय?

पेटबशीराबाद पोलीस ठाण्यात एक एफआयआर दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ७४ आणि ७५ अन्वये लैंगिक शोषण तसेच, पॉक्सो अंतर्गत कलम ११ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार, आरोपीने कथितरित्या जून २०२५ मध्ये मुलीला लग्नाचं खोटं वचन देऊन शरीरसंबंध ठेवले.

BJP Leader Bandi Sanjay Kumar’s Son Arrested
Shocking: २ हजार रुपयांच्या भाड्यासाठी मालकाकडे सोपवली बायको अन् पोरगी; दोघींवर घर मालकाकडून वारंवार अत्याचार

ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत तिला विचित्र वर्तन करण्यासाठी तसेच दारू पिण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याचे आरोप आहेत. ७ जानेवारीला त्यांच्यातील नाते संपुष्टात आले. त्यानंतर मुलीने नैराश्यातून दोनदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. तर भगीरथकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मुलीच्या आईवडिलांनी त्याच्याकडून पाच कोटी रुपये लुबाडण्याचे प्रयत्न केले आणि पैसे दिले नाहीत तर मुलगी आत्महत्या करेल, अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com