Riteish - Raja Shivaji Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंनी वीकेंडला मारली बाजी; 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम, आतापर्यंत किती कोटींची कमाई?

Raja Shivaji Box Office Collection Day 23 : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने चौथ्या वीकेंडला देखील बंपर कमाई केली आहे. 'राजा शिवाजी' मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' ने 'सैराट'ला मागे टाकले.

'राजा शिवाजी' ने चौथ्या वीकेंडलाही छप्परफाड कमाई केली.

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सध्या या चित्रपटाचा चौथा आठवडा सुरू आहे. तीन आठवड्यात चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा टप्पा पार केला आता चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर देखील १०० कोटी पार करेल. अलिकडेच चित्रपटाची success पार्टी थाटामाटात पार पडली. याला चित्रपटातील कलाकारांनी उपस्थिति लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला. चित्रपटाने २३ व्या दिवशी किती कमावले, जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 23

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ₹५२.६५ कोटी कमावले. दुसऱ्या आठवड्यात ₹२४.३० कोटींचा गल्ला जमावला. तिसऱ्या आठवड्यात सिनेमाने ₹१२.०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता चित्रपट चौथ्या आठवड्यात पाहायला मिळत आहे. २३व्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, २३ व्या दिवशी म्हणजे शनिवारी 'राजा शिवाजी' चित्रपटाने ₹१.३७ कोटी जमा केले. 'राजा शिवाजी'ची भारतातील आतापर्यंतची एकूण कमाई ₹९०.७७ कोटी (नेट कमाई) झाली आहे. लवकरच चित्रट १०० कोटींचा टप्पा गाठणार असल्याचे दिसत आहे.

रितेशची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'राजा शिवाजी' हा रितेशच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रोजेक्ट ठरला. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत अभिनेत्यान छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारली. सर्व त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले. रितेश देशमुखच्या गाजलेल्या चित्रपटांची यादी पाहा-

  • हाऊसफुल ४ -2019

  • टोटल धमाल -2019

  • एक विलन -2014

  • हाऊसफुल २ -2012

  • वेड -2022

  • लय भारी- 2014

मराठीतील टॉप ५ जास्त कमाई करणारे चित्रपट

  • राजा शिवाजी: 90.77 कोटी

  • सैराट – 90 कोटी

  • बाई पण भारी देवा – 76.28 कोटी

  • वेड – 61.2 कोटी

  • नटसम्राट – 42 कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा दणका! दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं कमळ; महायुतीत खळबळ

Sunday Horoscope: रविवारपासून बदलणार या 5 राशींचे नशीब! पैशांचा पाऊस, करिअरमध्ये मोठी झेप; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Ind vs SL : टीम इंडियाला जोरदार झटका; स्टार फलंदाज वेदनेनं विव्हळत मैदानाबाहेर गेला, चिंता वाढवणारा तो फोटो होतोय व्हायरल

India : पाण्यावर तरंगतंय संपूर्ण गाव! निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार पाहून व्हाल थक्क

Death News: २६वा वाढदिवस साजरा करण्याआधीच काळाचा घाला; प्रसिद्ध मॉडेल-इन्फ्लुएन्सरचं दुर्दैवी निधन

SCROLL FOR NEXT