Riteish-Genelia SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish-Genelia : जेव्हा रितेशनं जिनिलीयासोबत केलं होतं ब्रेकअप, त्यावेळी नेमकं काय झालं?

Riteish Breakup With Genelia : महाराष्ट्राच्या लाडक्या दादा वहिनींचा ब्रेकअप झाला होता. मजेशीर किस्सा वाचा.

Shreya Maskar

रितेश आणि जिनिलीया (Genelia) बॉलिवूडच पावर कपल आहे. तसेच ते महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी देखील आहेत. या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. अनेक लोक यांच्या प्रेमाचे आदर्श घेतात. रितेश देशमुख जिनिलीयाचा प्रचंड आदर करतो. रितेश-जिनिलीयाने 2012 साली लग्नगाठ बांधली. त्याआधी ही दोघ एकमेकांना डेट करत होती. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान यांची मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रितेश-जिनिलीया डेट करत असताना रितेश जिनिलीयासोबत एक खास गोष्ट करतो. जाणून घ्या काय?

जिनिलीया एका मुलाखतीत आपल्यासोबत घडलेला किस्सा सांगते. ती म्हणते की, "जेव्हा रितेश (Riteish Deshmukh) आणि मी एकमेकांना डेट करत होतो त्यावेळी रितेशने मला रात्री ब्रेकअपचा मेसेज केला होता आणि तो झोपला. त्याने मला जवळपास मध्यरात्री १ च्या दरम्यान मेसेज केला होता. तो दिवस 'एप्रिल फूल'चा होता. त्याने माझ्यासोबत प्रँक केला. मी लवकर झोपायचे आणि तो उशीरापर्यंत जागायचा. त्यामुळे जेव्हा मी मध्येच पहाटे अडीजच्या सुमारास उठले तेव्हा तो मेसेज वाचून हैराण झाले आणि काही वेळासाठी डिप्रेशनमध्ये गेले. माझं नेमकं काय चुकलं, हा असा का बोलत आहे हेच प्रश्न मनात येत होते. त्यानंतर सकाळी 9 वाजता त्याने मला नेहमीप्रमाणे हॅलो काय करतेस? असा मेसेज केला. कारण तो विसरला होता की, आपण रात्री काय मेसेज करून झोपलो आहोत ते."

पुढे जिनिलीया आणि रितेशमध्ये असा संवाद घडतो की, जिनिलीया रितेशला बोलते, आपण यापुढे बोललं नाही पाहिजे, मला तुझ्याशी अजिबात बोलायच नाही. त्यावर रितेश बोला की, काय झालंय नक्की? त्यावर जिनिलीया बोलते की, काही घडलंच नाहीये असा वागू नको आणि त्याला रात्रीच्या मेसेजची आठवण करून देते. त्यानंतर रितेशला सर्व आठवत आणि तो एप्रिल फूल केलं असे बोलतो. यावर जिनिलीया म्हणते की, असं कोण प्रँक करतं का? यापुढे असं करू नकोस. असा हा मजेशीर प्रँक रितेश जिनिलीयासोबत करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT