'बिग बॉस मराठी' चा (Bigg Boss Marathi) ग्रँड फिनाले रविवारी ( 6 ऑक्टोबर) पार पडला. यंदाच्या सीझन 5 चा विजेता महाराष्ट्राचा लाडका सूरज बनला. तर टॉप 2 मध्ये अभिजीत आणि निक्की आले. सूरजने बिग बॉसची ट्रॉफी उचलल्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजने सिद्धिविनायक आणि जेजुरीचं दर्शन घेतलं. शो जिंकल्यानंतर सूरजला 14.6 लाख मिळाले.
आता 'बिग बॉस मराठी'चा होस्ट म्हणजे सर्वांचे आवडते रितेश भाऊंनी यांनी सूरजसाठी एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सूरजला खूप मदत होणार आहे. रितेश भाऊंनी सूरजचा सर्व कामकाज पाहण्यासाठी मॅनेजर नेमून दिला आहे. हा मॅनेजर रितेश भाऊंच्या खूप विश्वासातील आहे. परिस्थितीमुळे सूरजला जास्त शिकता आले नाही. सूरज (Suraj Chavan) फक्त आठवी शिकला आहे. त्याचा स्वभावही साधाभोळा आहे. तसेच खूप प्रामाणिक आहे. त्याला कोणी फसवू नये म्हणून रितेशने (Riteish Deshmukh) हा निर्णय घेतला आहे. त्याची आर्थिक फसवणूक होऊ नये हाच या मागचा मोठा हेतू आहे. एक मॅनेजर देऊन रितेशने सूरजसाठी ही खूप खास गोष्ट केली आहे.
रितेशच्या या गोष्टीवर सूरज म्हणाला की, "मला रितेश सरांनी खूप महत्त्वाचा सपोर्ट केला आहे. त्यांनी मला त्यांच्या विश्वासातील पीए दिला आहे. त्यामुळे आता मला आयुष्यात स्वतःला उभं राहायच आहे. " केदार शिंदे सूरजवर चित्रपट देखील काढणार आहेत. ज्याचे नाव 'झापुक झुपुक' असणार आहे. तसेच सूरजही बिग बॉसच्या पैशातून स्वतःच घर बनवणार आहे. ज्याचे नाव तो 'बिग बॉस' असं ठेवणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.