Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : कोणाचं नशीब बदलणार? 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी कोण उचलणार? ग्रँड फिनालेची तारीख अन् वेळ नोट करा

Bigg Boss Marathi 6 - Grand Finale : 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहता येईल जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६'चे मिड-वीक एलिमिनेशन नुकतेच पार पडले.

'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

'बिग बॉस मराठी ६' ला टॉप ५ स्पर्धक भेटले.

'बिग बॉस मराठी ६'चा खेळ शेवटच्या टप्प्यावर आला आहे. गेल्या आठवड्यात राखी सावंतने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. या सीझनमध्ये १७ सदस्यांनी सहभाग घेतला आहे. आता फक्त शेवटचे टॉप ५ स्पर्धक उरले आहेत. या सीझनची थीम 'नशिबाचे दार' असे होते. या सीझनचे होस्टिंग रितेश भाऊंनी केले. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने राडा घातला. या शोला खूप लोकप्रियता मिळाली.

'बिग बॉस मराठी ६'च्या मिड-वीक एलिमिनेशनमध्ये रेवा कौरासे घराचा निरोप घेते. रेवा कौरासे ही वाइल्ड कार्ड एन्ट्री होती. आता बिग बॉसला टॉप ५ स्पर्धक भेटले आहेत.

टॉप-५ फायनलिस्ट कोण?

  1. तन्वी कोलते

  2. राकेश बापट

  3. अनुश्री माने

  4. विशाल कोटियन

  5. दिपाली सय्यद

ग्रँड फिनाले कधी?

बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच येणाऱ्या रविवारी थाटामाटात पार पडणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळेल. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले होणार आहे. व्होटिंग लाइन्स शनिवार 18 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

विजेता कोण?

‘बिग बॉस मराठी ६’ च्या सुरूवातीपासून विजेतेपदासाठी तन्वी कोलतेचे नाव चर्चेत आहे. तन्वी कोमलतेने आपल्या गेमने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर पहिल्या- दुसऱ्या रनरपसाठी राकेश बापट आणि अनुश्री माने यांची नावे चर्चेत आहेत. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. ग्रँड फिनालेला रितेश भाऊ ‘बिग बॉस मराठी ६’ चा विजेता घोषित करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT