Bigg Boss Marathi 6 : शेवटच्या क्षणी येऊन संधी हुकली; Mid-Week एलिमिनेशनमध्ये 'या' सदस्याचा पत्ता कट, टॉप ५ स्पर्धक कोण?

Bigg Boss Marathi 6 Mid Wek Elimination : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात मिड-वीक एलिमिनेशन पार पडले आहे. घरातील कोणता सदस्य बाहेर गेला, जाणून घेऊयात.
Bigg Boss Marathi 6 Mid Wek Elimination
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

'बिग बॉस मराठी ६' चा लवकरच ग्रँड फिनाले पार पडणार आहे.

घरात मिड-वीक एलिमिनेशन पार पडले आहे.

'बिग बॉस मराठी ६' ला आपले टॉप ५ स्पर्धक भेटले आहेत.

रितेश देशमुख होस्ट करत असलेला रिॲलिटी शो 'बिग बॉस मराठी ६' आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. लवकरच शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. गेल्याआठवड्यात राखी सावंतने बिग बॉसच्या घरातून निरोप घेतला आहे. राखीनंतर घरात नुकतेच मिड-वीक एलिमिनेशन पार पडले आहे. घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. मिड-वीक एलिमिनेशनमध्ये कोण घराबाहेर गेले, जाणून घेऊयात.

'बिग बॉस मराठी ६' च्या शेवटच्या एलिमिनेशनमध्ये हटके टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये एका बोर्डवर सात चौकटी होत्या. यामध्ये काही किल्ल्या ठेवण्यात आल्या होत्या. यात किल्ल्यांच्या बाजूला असलेल्या क्यू कार्ड्सवर स्पर्धकांसाठी खास मेसेज लिहून ठेवण्यात आले होते. या टास्कमध्ये राकेश बापट पहिला सेफ होतो आणि 'बिग बॉस मराठी ६'चा दुसरा फायनलिस्ट ठरतो. त्यानंतर तिसरी फायनलिस्ट अनुश्री माने आणि चौथ्या फायनलिस्ट विशाल कोटीयन ठरतो.

शेवटच्या क्षणी Danger झोनमध्ये दिपाली सय्यद आणि रेवा कौरासे उरतात. घरात तणावाचे वातावरण निर्माण होते. घरातील सदस्यांना अश्रू अनावर होतात. अखेर या आठवड्यात मिड-वीक एलिमिनेशनमध्ये रेवा कौरासे बिग बॉसच्या घराचा निरोप घेते. घरातील सर्व सदस्य रडू लागतात. आता बिग बॉसला टॉप ५ स्पर्धक भेटले आहेत.

टॉप-५ फायनलिस्ट कोण?

  • तन्वी कोलते

  • राकेश बापट

  • अनुश्री माने

  • विशाल कोटियन

  • दिपाली सय्यद

तुम्ही तुमच्या आवडत्या स्पर्धकाला शनिवार 18 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत व्होट करू शकता. व्होटिंग लाइन्स तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच येणाऱ्या रविवारी थाटामाटात पार पडणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळेल.

Bigg Boss Marathi 6 Mid Wek Elimination
Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी ६’च्या ट्रॉफीवर ‘या’ सदस्याचे नाव? टॉप ५ स्पर्धकांची नावं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com