Rinku Rajguru Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

Rinku Rajguru: पूर्वी नास्तिक असलेली रिंकू राजगुरू अध्यात्मावर कशी विश्वास ठेवू लागली? केदारनाथच्या आयुष्य बदलणाऱ्या अनुभवाबद्दल तिने काय सांगितले? जाणून घेऊयात

Shruti Vilas Kadam

Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतीच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक जीवनातील एक अनोखा आणि भावनिक प्रवास शेअर केला आहे. या अनुभवामुळे नास्तिक असलेली रिंकू आता अध्यात्म आणि विश्वासाकडे वळली आहे. या बदलाच्या मागे तिचा केदारनाथमध्ये मिळालेला अनुभव हा मुख्य कारण असल्याचे तिने स्पष्ट केले.

रिंकूने सांगितले की, तिच्या करीयरमधील ओळख ‘सैराट’मधील आर्चीच्या भूमिकेमुळे झाली, पण ती अभिनयाच्या दुनियेतील एक मेहनती कलाकार म्हणूनही ओळखली जाते. सोशल मीडियावर ती चाहत्यांशी जवळून संवाद साधते आणि तिचे अनुभव शेअर करते.

तिने सांगितले की, “पूर्वी मी नास्तिक होते,” पण केदारनाथला गेल्यावर पण केदारनाथला गेल्यावर, तिथे आलेल्या काही अनुभवांमुळे माझा थोडा विश्वास बसू लागला. मग मी उपवास वगैरे करायला लागले. पूजा करू लागले, मग मला त्याचे अनुभवही आले यातून मला मानसिक शांतता आणि समाधान मिळाले. पूजा-पाठ, सण-उत्सव यामागे काहीतरी वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणं आहेत, ज्यामुळे मन एकाग्र होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

केदारनाथमध्ये तिचा अनुभव अतिशय भावनिक होता. ती म्हणाली की, दर्शनानंतर मी खूप थकले होते मला हेलिकॉप्टरने परत जायचे होते. पण हेलिकॉप्टर नव्हतं मी खूप वाट पाहिली अंधारही झाला मला खूप भरुन आलं कारण दुसऱ्या दिवशीच माझी फ्लाईट होती. अचानक मला असे समजले की हेलिकॉप्टर आहे आणि त्यामध्ये दोन जागा आहेत, मी धावत गेले पण पुढे जाताना ती खाली पडल्यानंतर माझ्या गुडघ्याला लागलं. त्या घटनेनंतर मी देवाशी संवाद साधताना आता मी कधीच तक्रार करणार नाही त्याच क्षणी माला शिक्षा मिळाली कारण मला मिळूनही मी तक्रार करत राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT