Rhea Chakraborty SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rhea Chakraborty : ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला सर्वात मोठा दिलासा, मुंबई हाय कोर्टात नेमकं काय झालं?

Rhea Chakraborty 2020 Drug Case : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अंमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. रिया चक्रवर्ती हिला विदेशात जाण्याची परवानगी कोर्टाकडून मिळाली आहे. मुंबई हायकोर्टाकडून रिया चक्रवर्तीच्या जामिनाच्या अटी कमी करण्यात आल्या आहेत.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया आणि तिचा भाऊ अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवायचे, असा आरोप आहे. या प्रकरणात तिला 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. जामीन मंजूर करताना ट्रायल कोर्टाने रिया चक्रवर्तीला विशेष न्यायाधीशांच्या पूर्व परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये अशी अट घातली होती. ही अट अता शिथिल करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयात रिया चक्रवर्ती हिच्या वकिलाने जोरदार युक्तीवाद केला. ते म्हणाले की, "त्यांना (रिया चक्रवर्ती) कामासाठी परदेशात जावे लागते आणि पूर्व परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यांना काम सोडून द्यावे लागले. त्यामुळे आर्थिक चणचणही भासली." तसेच या प्रकरणात आठ सह-आरोपींनाही सवलत देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

विरोधी वकिलांनी आक्षेप घेतला की, रिया चक्रवर्ती हिला विशेष वागणूक देऊ नये. कारण ती एक सेलिब्रिटी आहे. ती देशात परत येऊ शकत नाही. पळून जाण्याचा धोका आहे. असा आरोप वकिलांनी केला. यावर उच्च न्यायालयाने म्हटले की, "रिया चक्रवर्ती यांनी आजपर्यंत खटल्यात सहकार्य केले आहे आणि त्यांच्यावर लादलेल्या कोणत्याही जामीन अटींचे उल्लंघन केल्याचे आढळलेले नाही. जेव्हा ती ट्रायल कोर्टाच्या परवानगीने प्रवास करते तेव्हा ती पुन्हा देशात येते."

उच्च न्यायालयाने म्हटले की, "परदेश प्रवास करण्यापूर्वी किमान चार दिवस आधी एजन्सीला कळवावे. संपूर्ण प्रवासाचा कार्यक्रम सादर करावा. प्रवास कार्यक्रमात तिच्या हॉटेल आणि विमान प्रवासाची माहिती देणे आवश्यक आहे. तिचा फोन नेहमी चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri chinchwad : शेअर मार्केटच्या नावाखाली ६४ लाखात फसवणूक; टोळी पोलिसांच्या ताब्यात

Jalna : जालन्यातील शेतकऱ्याने शेतातील भाजी काढण्यासाठी वापरला रोपवे | VIDEO

Natural Hair Growth: केस सतत गळतायेत, वाढ होत नाहीये? मग सकाळीच करा हे एक काम

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांना सर्वसमावेशक मदत देण्याचा प्रयत्न असेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करण्यासाठी किती तास लागतात?

SCROLL FOR NEXT