Maharashtra Live News Update : मेंढपाळ धनगर बांधवांना शिवसेनेची आर्थिक मदत

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, सोलापूर-बीड-धाराशिवमध्ये भयंकर पूरस्थिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह मंत्र्यांचा पूरग्रस्त भागात दौरा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील पूरस्थिती अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

एसआरएला स्कॉच परिषदेचा सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या १०३व्या स्कॉच परिषदेत महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयाला “नागरी केंद्रित डिजिटल सेवा” या उपक्रमासाठी सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्कार प्रदान करण्यात आला. या परिषदेतील मूल्यमापनामध्ये देशभरातील ३०० हून अधिक संस्था सहभागी झाल्या होत्या.

महाराष्ट्रातून आणखी काही संस्थांनी यश मिळवत राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाला गोल्ड, तर जिल्हा परिषद अमरावती, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक, जिल्हा प्रशासन हिंगोली आणि मोटार वाहन विभाग यांना सिल्वर पुरस्कार मिळाले.

प्राधिकरणाचे सीईओ डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक, तंत्रज्ञानाधिष्ठित व नागरिकाभिमुख सेवा पुरविण्यात सातत्य असल्याचे सांगण्यात आले. हा सन्मान झोपडपट्टीवासियांच्या विश्वास व सहकार्याला समर्पित असल्याचे प्राधिकरणाने नमूद केले.

मेंढपाळ धनगर बांधवांना शिवसेनेची आर्थिक मदत

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पंथेवाडी येथील मेंढपाळ धनगर बांधव मल्हारी डोईफोडे व अंबादास खोलाडे यांच्या अतिवृष्टीच्या महापुरात ३० मेंढ्या व २ बैल वाहून गेल्या होते. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या दोन्ही मेंढपाळ बांधवांना 50 - 50 हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज गुरुवार २५ सप्टेंबर रोजी धनादेश देऊन या मेंढपाळ बांधवांना या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात देण्यात आला.

बोरिवली पूलाखालील रस्त्यावर अचानक पडला मोठा खड्डा

बोरिवली पश्चिमेतील सुमेर नगर पूलाखालील रस्त्यावर अचानक मोठा खड्डा पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून बीएमसी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अचानक निर्माण झालेल्या या खड्ड्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे पालिकेच्या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महादेवी हत्ती परत येण्याचा मार्ग सुकर,जॉईंट प्रपोजल देण्याचे न्यायमूर्तींचे आदेश

महादेवी हत्ती परत आणण्यासाठी जॉईंट प्रपोजल देण्याचे न्यायमूर्तींचे आदेश

मठाचे वकील, वनताराचे वकील, राज्य सरकार वनविभाग यांनी जॉईन्ट प्रपोसलं दाखल करावं

जॉईन प्रपोजल दाखल करण्यासाठी मठाने एक आठवड्याचा अवधी मागितला,

पेटाचा युक्तिवाद न्यायमूर्तींनी खोडून काढला, महादेवी हत्तीची जागा तांत्रिक हत्ती घेऊ शकत नाही

कॉन्स्टेबल मंजू मालिका आता ''इन्स्पेक्टर मंजू" नावाने 29 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला.

सन मराठी वरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या अभूतपूर्व यशा नंतर दुसऱ्या नवीन पर्वात "इन्स्पेक्टर मंजू" या नावाने ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात सुरू आहे. 29 सप्टेंबर पासून रात्री 8 वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. प्रमुख भूमिकेत असणारे मंजू आणि साताऱ्याचा सत्या अर्थात मोनिका राठी आणि वैभव कदम हे पुन्हा एकदा या मालिकेतून पाहायला मिळणार आहेत.

एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर

पुणे सत्र न्यायालयाकडून प्रांजल खेवलकर यांना जमीन मंजूर करण्यात आला आहे

- तुमसर नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रितेमुळे दुर्गा देवीचा पेंडालात घाण पाण्याच्या विळखा

भंडारा जिल्ह्यात आज पावसानं चांगलाच झोडपून काढलं.तर तुमसर शहरात या पाऊसामुळे व नगरपरिषदेच्या निष्क्रीयतेमुळे तुमसरातील मधील प्रसिद्ध बावडी मंदिर येथे स्थापण केलेल्या दुर्गा देवीच्या मुर्ती समोर नाली मधिल दुर्गंधी युक्त घाण पाणी साचले आहे, हे घाण पाणी निघण्यास मार्ग नसल्याने नागरिकांच्या श्रद्धेच्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत आहे.ऐवढेच नव्हे तर मंडळा कडून वॉटर पंप आणुन पाणी काढण्याची योजना आता स्वतः दुर्गा मंडळा कडून करण्यात येत आहे.

Ajit Pawar : आरक्षणाबाबत अजित पवारांचं मोठं विधान

बीड ब्रेक: आरक्षणाबाबत अजित पवारांचं मोठं विधान

सुप्रिया सुळेंनंतर अजित पवारांचं मोठं विधान

आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं - अजित पवार

ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळावं - अजित पवार

आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं त्याला आमचं दुमत असण्याचे कारण नाही - अजित पवार

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल

Thane : नवरात्रौत्सवानिमित्त ठाण्यातील टेंभी नाक्यावर रश्मी ठाकरे यांची हजेरी

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांची सरकार थट्टा करतंय - उद्धव ठाकरे

Summary

धाराशिवमधील पाहणी दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 'मराठवाड्यावर भीषण संकट ओढावलं आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरु आहे. सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. मुख्यमंत्री म्हणाले राजकारण आणू नये तसे मी आणणार नाही', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Nashik : अवघ्या १२ तासांत दोन हत्यांच्या घटनेनं नाशिक हादरलं

- अवघ्या १२ तासांत दोन हत्यांच्या घटनेनं नाशिक हादरलं

- नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात पुन्हा एका व्यक्तीची हत्या

- दगडाने ठेचून एका व्यक्तीची हत्या, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

- इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल, अधिक तपास सुरू

- भर दिवसा एका कॅफेत हत्या झाल्याने खळबळ

ST प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बुलढाण्यात निघाला बंजारा समाजाचा महामोर्चा.

बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटीयर नुसार एसटीतून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज बुलढाण्यात सरकारला निवेदन देण्यासाठी मोठा मोर्चा काढला आहे. या मोर्चात हजारो बंजारा बांधव सहभागी झालेले आहेत. मोर्चात बंजारा भगिनींनी पारंपारिक पोशाख परिधान करत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. संपूर्ण बुलढाणा शहर सध्या बंजारामय झाल असून हा मोर्चा शहराच्या विविध भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. आम्हाला एसटीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं..! अशा घोषणांनी संपूर्ण बुलढाणा शहर दणाणून निघाल आहे

Lalbaghcha Raja : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात...

मुंबईतील लालबाग राजा मंडळाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 लाख रुपये मदत करणार असल्याची माहिती ...

मंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 50 लाखाचा धनादेश केला जाणार सुपूर्द...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाणार धनादेश...

Nagpur : - नागपुरात भेसळ आणि केमिकल युक्त खाद्य पदार्थावर विक्री करणाऱ्यांवर केली कारवाई

- नागपुरात अन्न व औषधी प्रशासन विभागाची सणासुदीच्या काळात भेसळ आणि केमिकल युक्त खाद्य पदार्थावर विक्री करणाऱ्यावर केली कारवाई

- 5 लाख रुपये किमतीचे गुलाब जमून, रसगुल्ला, बर्फी मिश्रण आणि दही करण्यात आलं जप्त

- पारडी भागातील पुनापुर मार्गावर असलेल्या भोजराज लिलहारे यांच्या जी एस स्वीटस आणि नमकीन च्या प्रतिष्ठान वर करण्यात आली कारवाई...

- गुलाब जमून रसगुल्ले हे घाणेरड्या जागेत बनवून ठेवण्यात येत होते. त्याच प्रमाणे यात केमिकल मिक्स करून भेसळ केली जात होती.

- सगळ्या पदार्थांचे नमुने विश्लेषणा साठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहराला कारसोजेंकिक पिण्याच्या पाण्यामुळे कर्करोगाचा विळखा

पवना नदी पात्रात सोडण्यात येणार सांड पाणी, कंपन्यांमधून नदीपात्रात सोडण्यात आलेलं रसायन मिश्रित पाणी यामुळे नदीपात्रातील पाण्यात कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या कारसिनोजेनिक घटकाचा प्रमाण वाढल्याचा दावा पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरण प्रेमींनी केला आहे. पिंपरी चिंचवड शहराला प्रामुख्याने 80 टक्के पाणीपुरवठा हा पवना नदीपात्रातून होतो. मात्र पवना धरणापासून ते रावेत येथील बंधाऱ्यापर्यंत वाहणाऱ्या नदीपात्रात अनेक कंपन्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पवना नदीपात्रात कंपन्यांनी सोडलेलं रशियन मिश्रित पाणी त्याचबरोबर नागरी वस्तीतून प्रक्रिया करण्यात न आलेलं सांडपाणी सोडल्यामुळे पवना नदी पात्रात कारसिनोजेनिक घटकाचे प्रमाण वाढला आहे.

Pune : कर्नल पुरोहित यांची भारतीय लष्कर दलात पदोन्नती

कर्नल पुरोहित यांची भारतीय लष्कर दलात पदोन्नती, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आता बनले कर्नल

पुरोहित यांची काही दिवसांपूर्वी मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती

Beed: बीडमध्ये उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा; शेतकऱ्यांचा संवाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहे. त्यांनी आज बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांची व्यथा ऐकली.

पिंपरी चिंचवड शहरातील चिखलीमध्ये बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ

रातोरात तब्बल 10 चारचाकी गाड्यांच्या बॅटरींची चोरी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.. या भागामध्ये पोलिसांची रात्र गस्त करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. रातोरात दहा बॅटरी चोरीला गेल्यामुळे वाहन चालकांच मोठ आर्थिक नुकसान झाल आहे. मध्यरात्री एकच्या नंतर या सर्व बॅटरी चोऱ्या झाल्या आहेत. यामध्ये चार चाकी कार, ट्रकचा सहभाग आहे. चोरीची घटना तेथील एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिस या सीसीटीव्ही च्या मदतीने करणार आहेत.

Beed: अजित पवार शेतकऱ्यांवर संतापले

अजित पवार शेतकऱ्यावर संतापले बीडच्या आहेर चिंचोली येथील शेतकऱ्यांनी दादांना एकदा आमचं शेत बघा अशी विनंती केल्यानंतर चक्क दादा म्हणाले अरे बघितलं ना किती वेळेस बघायचं .

अजित पवार तलाठ्याला बोलत असताना शेतकरी म्हणाले दादा तुम्ही एकदा बघा काय झालं आहे शेतीचं त्यावेळेस दादा चांगले शेतकरी यावर संत आपले आणि अरे बघितलं ना किती वेळेस बघायचं तुम्हाला मदत करतो मी आहे घाबरू नका मदत करणार 100% तुम्हाला

सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत मुख्यमंत्री १५ दिवसांत बैठक घेणार

नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती इतक्या जास्त आहेत की सर्वसामान्य नागरिकांनी घर घेण्यास नकार दिला आहे. याचा थेट फटका सिडकोला बसला असून अनेकांनी घरं परत केली आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपासून बैठक न घेतल्यामुळे किमती कमी करण्याचा निर्णय अद्याप झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून आश्वासन दिलं आहे की पंधरा दिवसांत सिडको घरांच्या किमतींवर बैठक घेऊन निर्णय केला जाईल.

Nashik: वडनेर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात २ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

- नाशिकच्या वडनेर परिसरात दीड महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात २ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

- चिमुरड्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक

- देवळाली आणि वडनेर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा वनविभागाच्या कार्यालयावर ठिय्या

- प्रतिकात्मक बिबटे घेऊन ग्रामस्थांचं वनविभागाच्या कार्यालयावर आंदोलन

- नरभक्षक बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

- नरभक्षण बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला ग्रामस्थांकडून ४ दिवसांच अल्टीमेटम

- वनविभागाने तात्काळ ठोस उपयोजना न केल्यास, ग्रामस्थांकडून पिंजऱ्यात अडकलेले बिबटे अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडण्याचा इशारा

पुसदच्या रस्त्यावर लाखोच्या संख्येने उतरले बंजारा बांधव

बंजारा समाजाला एसटी प्रवर्गमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी यवतमाळच्या पुसद शहरात गोर सेना व सकल बंजारा समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. यामध्ये परंपारिक वेशभूषा करून महिला व पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. लाखोच्या संख्येने एकवटलेल्या बंजारा समाज बांधवानी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळेसाठी पुसद शहरातील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, त्यांना कर्जमुक्त करा - उद्धव ठाकरेंची मागणी

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, त्यांना कर्जमुक्त करा - उद्धव ठाकरेंची मागणी.

सरकारकडून अन्याय होऊ देणार नाही - ठाकरे.

योग्य वेळ कधी येणार, त्यासाठी पंचांग पाहणार आहात का? ठाकरेंचा सवाल.

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत करा - ठाकरेंची मागणी.

धाराशिवच्या इटकुरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पाहणी दौऱा आणि शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारकडे मागणी केली.

Jalna: नुकसानीचे पंचनामे न झाल्याने जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी झाले आक्रमक

मंठा तालुक्यातील जयपूर वडगाव तळणी या परिसरात मागील काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मात्र निवेदन देऊन एक महिना झाला तरीही नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने हे शेतकरी आता हा आक्रमक होऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले आहेत

Ramdas Aathavle: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

शेतकऱ्यांच्या बांधावर जात आठवले यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

शेतकऱ्यांनी मांडल्या आठवले यांच्या समोर व्यथा

आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही, सरकारने ठोस मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी

हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन गेला आहे,सरसकटसह भरीव नुकसानीची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

शेतकऱ्यांची मागणी शासन दरबारी मांडून न्याय देऊ असं केंद्रीय आठवलेंकडून आश्वासन

Pune: पुणे जिल्ह्यातील पाऊस ओसरला

घाटमाथ्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला

खडकवासला धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबण्यात येणार

दुपारी २ वाजता खडकवासला धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येणार

पुण्यातील चार ही धरणात १०० टक्के पाणीसाठा

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणात १०० टक्के पाणीसाठा

Pune Airport: पुणे विमानतळावर महिलेच्या बॅग मध्ये आढळले आले पिस्तूल

"अघोरी विद्येची" पूजा करणाऱ्या महिलेला भेट म्हणून मिळालेलं पिस्तूल

महिलेच्या बॅगेतून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त

पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वैशाली वैभव दोशी (वय ४४) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पुणे विमानतळावर घडली. मूळच्या बारामती मधील राहणाऱ्या दोशी या तंत्र विद्येचा व्यवसाय करतात. त्या पुण्यावरून इंदौरमार्गे दिल्लीला निघाल्या होत्या.

बॅग तपासणीदरम्यान संशयास्पद "मेटल डिटेक्ट" झाल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले आणि बॅग उघडण्यास सांगितली. यावेळी तपासणी दरम्यान, त्यांच्या बॅग मध्ये १ पिस्तूल व जिवंत काडतुसे आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना हे पिस्तूल त्यांच्या एका शिष्याने दिले होते आणि त्या जंगलात जाऊन पूजा करत असल्याने त्यांना याची गरज आहे असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. अधिक चौकशींकेळी असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झालं आहे

Beed: सिंदफना नदीकाठच्या तांदळवाडी हवेली येथील शेतकऱ्याची जमीन भुईसपाट

बीड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाला असून बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदळवाडी हवेली येथील अनकुटा बंधारा लगत असलेली शेतकऱ्यांची चार एकर जमीन पाण्यामध्ये वाहून गेले असून नुसता आता खडक शिल्लक राहिला आहे आम्ही मदत मागायची कुणाकडे आम्हाला तात्काळ मदत करा अशी हाक तांदळवाडी हवेली आहे चिंचोली येथील शेतकऱ्यांनी असा प्रश्न विचारला आहे.

पूरग्रस्तांना मदत करताना विरोधी पक्ष राजकारण आणत आहे- नीलम गोऱ्हे

धाराशिव मध्ये काल आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे

सर्व मंत्र्यांना आदेश दिले आहेत पूरग्रस्तांना मदत करा

पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानंतर मदत केली जाईल

राज्य सरकारने केंद्र सरकार पूरग्रस्तांना मदत करत असताना त्यामध्ये विरोधी पक्ष राजकारण आणत आहे, असं त्यांनी करू नये

Solapur: सोलापुरात आलेल्या महाप्रलयामुळे जिल्ह्यातील शेकडो गावे पुराखाली

- सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालं अस्मानी संकट

- जिल्ह्यातील शेकडो गाव पुराच्या पाण्याखाली

- जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, माढा अशा अनेक तालुक्यांना पुराच्या पाण्याचा वेढा

- जिल्ह्यातील हत्तुर, समशेपूर, वांगी, पाकणी, वडकबाळ अशी अनेक गावं अक्षरशः पाण्याखाली

- उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापूर गावचे हे विदारक चित्र आपल्या ड्रोन कॅमेरात कैद केलय बुद्धभूषण काटे यांनी

- शेकडो नागरिकांचा संसार उघड्यावर, तर संपूर्ण घर पुराच्या पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थ हतबल

- शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने घेतला हिरावून

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आज धाराशिवच्या दौऱ्यावर

उद्धव ठाकरे यांचं लातूर विमानतळावर आगमन, सोबत मिलिंद नार्वेकर लातूरच्या काडगाव येथे अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेती पिकांची करणार पाहणी. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील कळंब कडे पाहणी साठी रवाना होणार.

Yavatmal: यवतमाळमध्ये चहा कॅन्टीनच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट

यवतमाळच्या तहसील चौक परिसरामध्ये असलेल्या पेन किलर चहा कॅन्टीन मध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानातील साहित्य जळून खाक झाले दरम्यान अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. दरम्यान या घटनेत कोणती जीवितानी झालेली नाही

Malegaon:मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात पंचनामे सुरू

नाशिकच्या मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशा नंतर,महसूल,कृषी अधिकारी,तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी करत नुकसानी चे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून त्याचा अहवाल तातडीने वरिष्टना पाठवण्यात येणार आहे

Nashik: नाशिकच्या सातपूर परिसरात गुंडांचा हैदोस

- रस्त्याने घरी जाणाऱ्या कामगाराचा गुंडांकडून खून

- गुंडांनी पैसे मागितले असता पैसे न दिल्याच्या कारणावरून कामगाराचा गुंडांकडून खून

- जगदीश वानखेडे असे खून झालेल्या कामगाराचे नाव

- रात्री घरी असतांना श्रमिकनगर परिसरात कामगाराची गाडी अडवून गुंडांनी मागितले पैसे

- पैसे न दिल्याच्या रागातून चाकूने वार करत गुंडांनी केला कामगाराचा खून

Amravati:अमरावतीत दोन ओबीसी बांधवांचे आमरण उपोषण सुरू...

मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करण्याचा 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय रद्द करा, शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदीची पडताळणी करण्याकरता शासनाने उच्चस्तरीय उपसमिती नेमण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांची 50 टक्के शिष्यवृत्ती 100 टक्के करण्यात यावी, जातीनिहाय जनगणना त्वरित करण्यात यावी, महायुतीला भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण संघर्ष समितीचे चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाढोणकर हे दोन व्यक्ती अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे, आज त्यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे, राज्य सरकारने मागण्याची दखल घ्यावी अन्यथा अमरावती जिल्ह्यातील समस्त सकल ओबीसी बांधव सरकारविरुद्ध एल्गार करेल असा इशारा देण्यात आला आहे

कोपरगाव शहरात दोन गटात राडा; दगडफेक आणि हाणामारी

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात दोन गटात तुंबळ राडा झाल्याची घटना काल रात्री घडली आहे.. मोहनीराजनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.. सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्याने जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे.. जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन पोलिसही जखमी झाले आहेत.. त्यानंतर काही वेळात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला.. जमावाने या प्रकरणात संबंधित दोन्ही गटातील 63 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूच्या 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय.. या प्रकरणात शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे स्विय सहाय्यक यांच्यावर आणि मनसेच्या शहरप्रमुखावर देखील गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे..

Coastal Road: कोस्टल रोड टनलमध्ये गाडीला आग; वाहतूक ठप्प

मुंबईतील ताडदेव परिसरातील कोस्टल रोड टनेलमध्ये एका गाडीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर तात्काळ दक्षिण व उत्तरमार्गे जाणारी वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न सुरू केले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.

Latur: लातूरच्या उजेड गावाला पुराचा फटका मांजरा नदीला पूर

लातूर जिल्ह्यातील पाऊस कालपासून थांबला असला तरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना आजही पूरस्थिती आहे. मांजरा नदीला पूर आल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड गावाला मोठा मटका बसलाय, शेतात असणारे नागरिक आणि शेतकरी पुराच्या पाण्यामुळे अडकून बसले आहेत, शेतकऱ्यांचे जनावरे देखील पाण्यातच आहेत. दरम्यान सगळी शेती पाण्यात गेली, जनावरांना चार दिवसापासून चारा नाही जगायचं कसं असं म्हणत शेतकरी आक्रोश करत आहे.. पूर येण्यापूर्वी स्वतः शेतकऱ्यांनी तहसीलदारांना कल्पना दिली होती मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय..

Nanded: विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले, गोदावरी नदीपत्रात पाणी सोडले

नांदेड-

विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे कालपासून उघडले

गोदावरी नदीपत्रात 2 लाख 77 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू

गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, लाखो हेक्टर शेती पिकांना बसणार फटका

Pune: पुण्यात नामांकित खासगी विद्यापीठाची 2.5 कोटींना फसवणूक

पुणे -

पुण्यात नामांकित खासगी विद्यापीठाची 2.5 कोटींना फसवणूक

PhD करणाऱ्या 34 वर्षीय तरुणाला सायबर पोलिसांनी केली अटक

परदेशातून पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीचे शिक्षण घेतलेल्या आरोपीने अशी केली फसवणूक

सितैया किलारु अस फसवणूक केलेल्या आरोपीचे नाव

‘आयआयटी’ मुंबईतील प्राध्यापक असल्याचं भासवत आरोपीने 2.5 कोटी रुपयांना गंडवलं

पुण्यातील एका प्राध्यापकाचा विश्वास संपादन करत केली सायबर फसवणूक

Dharashiv: सरकारने सगळ सोडून नुकसानग्रस्तांना युध्दपातळीवर मदत करावी - संभाजीराजे छत्रपती

सरकारने सगळ सोडून नुकसानग्रस्तांना युध्दपातळीवर मदत करावी - संभाजीराजे छत्रपती

जगायचं कस असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय

शेतकऱ्यांच्या गायी जनावरे जाग्यावर दगावले,

नुकसानीची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना पञाद्वारे सांगणार

Nashik: नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, ड्रग्जचा मोठा साठा जप्त

- नाशिक ग्रामीण आणि येवला शहर पोलिसांची संयुक्त कारवाई

- अमीना नगर परिसरातून एमडी ड्रग, कुत्ता गोली आणि इतर नशेचा साठा जप्त...

- लाखोंच्या घरात किंमत असलेला ड्रग्स साठा पोलिसांच्या ताब्यात

- चोरीछुपे विक्री होत असल्याने परिसरात खळबळ

- संशयित आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू

Kalyan: कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडीच्या देवीला भाविकांची मोठी गर्दी

कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडीच्या देवीला भाविकांची मोठी गर्दी

तीन दिवसांत दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातवा - आठव्या दिवशी दर्शनाला येणार

Parbhani: परभणीत गोदावरीचा पूर कायम, डॉक्टरांची टीम गावात दाखल

परभणी -

परभणीत गोदावरीचा पूर कायम

प्रशासनाकडून पुराने वेढलेल्या गावाला आरोग्य मदत

डॉक्टरांची टीम वैद्यकिय साहित्यासह बोटीने गावात

Pune: मुसळधार पावसामुळे DMER परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

पुणे -

मुसळधार पावसामुळे DMER परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाकडून पत्र जाहीर

सोलापूर आणि मराठवाड्यातील पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने नियोजित परीक्षा पुढे ढकलली

आज आणि उद्या या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते

नवीन परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल अशी माहिती विभागाकडून पत्राद्वारे देण्यात आली आहे

Nashik: नाशिकमध्ये ४ ते ५ गाड्यांची तोडफोड, टवाळखोरांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न

नाशिक -

- नाशिकच्या राजीवनगर परिसरात टवाळखोरांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न

- ४ ते ५ गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न

- काल रात्रीच्या सुमारास घडली घटना, पाच ते सहा मद्यधुंद तरुणांनी गाड्यांची केली तोडफोड

- पोलीस घटनास्थळी दाखल होत काही जणांना घेतले ताब्यात

- सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू

- नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Amravati: अमरावतीमध्ये पोल्ट्रीफार्म मालकाने शेकडो मृत कोंबड्या तलावात टाकल्या

अमरावती -

पोल्ट्रीफार्म मालकाने शेकडो मृत कोंबड्या तलावात टाकल्या

अमरावती जिल्ह्यातील डीगरगव्हाण येथील घटना

डिगरगव्हाण तलावात मृत कोंबड्यांचा खच

दुर्गंधीने नागरिक हैराण झालेत

नागरिकामध्ये संतापाची लाट

Pune: पुरंदर विमानतळासाठी ९४ टक्के शेतकऱ्यांची संमती,  उद्यापासून मोजणीला सुरुवात

पुणे -

पुरंदर विमानतळासाठी ९४ टक्के शेतकऱ्यांची संमती दिल्याने उद्यापासून मोजणीला सुरुवात

पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी सात गावांतील शेतकऱ्यांची संमती वाढत आहे

आतापर्यंत तब्बल ९४ टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास होकार दिल्याय

त्यामुळे उद्याच्या शुक्रवारपासून मोजणीची प्रक्रिया सुरू होऊन २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल.

कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्यात येणार आहे यापैकी २,७०० एकरपेक्षा जास्त जमिनीला संमती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune: ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामती पोलिस ठाण्यात हजर होणार

पुणे -

ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामती पोलिसांकडे हजर होणार

बारामती मध्ये ओ बी सी समाजाचा मोर्चा काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे हाके यांचे म्हणणे

परभणीमधून हाके त्यांच्या समर्थकांसह बारामतीमध्ये दाखल

हाके यांच्यासह १४ जणं पोलिसात हजर होणार

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील 3295 गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर

यवतमाळ -

यवतमाळ जिल्ह्यातील 3295 गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर

नवरात्रोत्सव सुरू असून या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट झाले

पोलिसांनी जिल्ह्यातील 3295 गुन्हेगारांना रडारवर घेतली आहे

आतापर्यंत 1 हजार 840 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 31 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Pandharpur: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडून पूरग्रस्तांसाठी मदत, फूड पॅकेट आणि प्रसादाचे बुंदी लाडू वाटप

पंढरपूर -

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडून पूरग्रस्तांसाठी मदत

फूड पॅकेट आणि प्रसादाचे बुंदी लाडू वाटप

विठ्ठल मंदिराकडून 1700 फूड पॅकेटस

Solapur: माढामधील लोकांचे संसार उभे करण्यासाठी मदतीचे आवाहन

पंढरपूर -

माढामधील लोकांचे संसार उभे करण्यासाठी मदतीचे आवाहन

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार अभिजीत पाटील यांचा पुढाकार

माढा चे आमदार अभिजीत पाटील यांचा एक हात मदतीचा उपक्रम

Pune: साखर गाळप हंगाम धोरण सोमवारी ठरणार, सोमवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक

पुणे -

साखर गाळप हंगाम धोरण सोमवारी ठरणार

१५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची ‘विस्मा’ची मागणी

राज्यातील २०२५-२६ चा साखर गाळप हंगाम सुरू करण्याबाबतचे धोरण सोमवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठकीत निश्चित होणार आहे.

या बैठकीत गाळप हंगामाची तारीख, ऊस बिले, वसुली व कारखानदारांच्या अडचणींवर चर्चा होणार आहे.

दरम्यान, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे.

तसेच ऊस तोडणी मजुरांच्या सुविधा, गाळप परवाना नियम, वीज अनुदान आणि गूळ उत्पादकांवरील परवाना अटी शिथिल करण्याची मागणीही त्यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com