Dhanashree Verma : युजवेंद्र चहलनं धोका दिला? लग्नाच्या दोन महिन्यात रंगेहात पकडल्याचा दावा, काय म्हणाली धनश्री वर्मा? पाहा VIDEO

Dhanashree Verma Talk About Yuzvendra Chahal : अलिकडेच धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलचा घटस्फोट झाला आहे. आता धनश्री वर्माने आपल्या नात्यासंबंधित धक्कादायक खुलासा केला आहे.
Dhanashree Verma Talk About Yuzvendra Chahal
Dhanashree Verma SAAM TV
Published On
Summary

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलचा घटस्फोट झाला आहे.

धनश्री वर्माने प्रेमात आपली फसवणूक झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

धनश्री वर्मा सध्या 'Rise And Fall' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे.

कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) खूप वेळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत आहे. नुकताच धनश्री वर्माचा क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत घटस्फोट झाला आहे. त्यानंतर धनश्री वर्मा 'Rise And Fall' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे. धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलचे नाते कामय चर्चेत राहिले आहे. आता मात्र 'Rise And Fall' शोमध्ये धनश्री वर्माने युजवेंद्र चहलसोबतच्या नात्यासंबंधित मोठा खुलासा केला आहे.

शोमध्ये धनश्री वर्मा आणि कुब्रा सैत एकमेकांशी नाश्ता करताना गप्पा मारत असतात. ज्यात कुब्रा सैत धनश्रीला विचारते की, "आपल्याला कधी समजते की नातं भविष्यात चालणार नाही? " तेव्हा धनश्री उत्तर देत म्हणाली की, "पहिल्या वर्षात...मी तर दुसऱ्या महिन्यात त्याला पकडलं..." हे ऐकताच कुब्रा सैतला मोठा धक्का बसतो. अशाप्रकारे युजवेंद्र चहलचे नाव न घेता धनश्रीने आपल्या फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा 2020मध्ये लग्न बंधनात अडकले होते. त्यानंतर 2025 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. लग्नाच्या 5 वर्षांनी हे जोडपे विभक्त झाले आहे. तसेच धनश्री वर्माने या शोमध्ये युजवेंद्र चहलकडून आपण पोटगी घेतली नसल्याचे सांगितले आहे. सध्या युजवेंद्र चहलचे नाव आर जे महावशसोबत जोडले जात आहे.

धनश्री वर्माचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 6.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती आपल्या हटके डान्स स्टाइलसाठी ओळखली जाते. तसेच 'Rise And Fall'मधील तिचा गेम चाहत्यांना खूप आवडत आहे. या शोमध्ये धनश्री वर्मा आपल्या नात्याबद्दल आणखी किती खुलासे करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Dhanashree Verma Talk About Yuzvendra Chahal
Manache Shlok : कुटुंब, प्रेम अन् मैत्रीची रंगतदार गोष्ट; 'मना’चे श्लोक'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com