Rekha  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rekha : रेखा यांच्या पुढे माधुरी-उर्मिला पडल्या फिक्या; हटके डान्सने वेधलं लक्ष, पाहा व्हायरल VIDEO

Rekha Dance Video : रेखा यांचा शबाना आझमी यांच्या बर्थडे पार्टीतील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात रेखा या माधुरी दीक्षितसोबत डान्स करताना दिसत आहेत.

Shreya Maskar

शबाना आझमी यांच्या बर्थडे पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

रेखा आणि माधुरी दीक्षित यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रेखा यांच्या स्टायलिश लूक आणि हटके डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्या 18 सप्टेंबरला 75 वर्षांच्या झाल्या आहेत. शबाना आझमी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यात अभिनेत्रींचा ग्लॅमरस लूक आणि हटके फॅशन पाहायला मिळाली. पार्टीतील अभिनेत्रींचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पार्टीत दिग्गज अभिनेत्री रेखा (Rekha Dance Video) यांनी आपल्या डान्स आणि लूकने चारचाँद लावले आहेत.

शबाना आझमी यांच्या वाढदिवसाची पार्टीतील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, विद्या बालन, रेखा आणि शबाना आझमी तुफान डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये रेखा'कैसी पहेली जिंदगानी' गाण्यावर माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, विद्या बालन आणि शबाना आझमी यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कातिल आहेत. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंटसचा वर्षाव होत आहे. त्यांच्या लूकचे, डान्समधील एनर्जीचे कौतुक होताना दिसत आहे.

रेखा यांच्या हटके डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 70 वर्षांच्या रेखा यांच्या पार्टीतील लूकची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे स्टायलिश जॅकेट परिधान केले आहे. डोक्यावर कॅप आणि सनग्लासेस मध्ये त्या खुपच सुंदर दिसत आहे. फॅशन आणि डान्समध्ये त्यांनी माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर यांना मागे टाकले आहे.

माधुरी दीक्षित यांनी लाल रंगाचा को-ऑर्ड सेटपरिधान केला आहे. तर उर्मिला मातोंडकरने सोनेरी आणि काळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केला आहे. विद्या बालन राखाडी रंगाच्या पोशाखात सुंदर दिसत होती. तर शबाना आझमी यांनी काळ्या आणि लाल रंगाच्या ड्रेस परिधान केला होता. सर्व अभिनेत्री खूपच छान दिसत होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: राज्यातील डाळिंबाच्या बागा टार्गेट? पुण्यातील शेतातून तब्बल ४.५ हजार किलो डाळिंब चोरीला, सोलापुरातही तशीच घटना

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे मयत गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांच्या आज भेट घेणार

Scholarship Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, 'या' दिवशी होणार पेपर

ठाकरे गटाच्या खासदाराला 100 कोटींसह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, माजी आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

Tilachi Chutney Recipe : हिवाळ्यात खायलाच पाहिजे, तिळाची पौष्टिक आणि चवदार चटणी!

SCROLL FOR NEXT