Rekha and Amitabh Bachchan x
मनोरंजन बातम्या

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Rekha and Amitabh Bachchan : रेखा आणि अभिताभ बच्चन यांचे नाव एकमेकांशी जोडले जाते. रेखा-अभिताभ यांच्या खासगी नात्यावर रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन यांनी प्रतिक्रिया दिली होती.

Yash Shirke

Rekha and Amitabh Bachchan Relation : सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या काळात अभिनेत्री रेखा या बॉलिवूडवर राज्य करत होत्या. याचदरम्यान खुबसुरत, उमराव जान, खून भरी माँग असे त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. रेखा यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांचे खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिले. अभिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे नाव जोडले गेले. त्यांची कहाणी प्रचंड गाजली आहे, याबाबत आजही चर्चा होत असते. रेखा आणि अभिताभ यांच्या नात्यावर रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन यांनी भाष्य केले होते.

ओल्ड स्टार अँड स्टाइला जेमिनी गणेशन यांनी मुलाखत दिली होती. तेव्हा त्यांनी अभिताभ आणि रेखा यांच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. 'तिने (रेखाने) अभिताभसोबत संबंध ठेवून स्वत:चे खासगी आयुष्य उद्धवस्त केले आहे, असे लोक मला सांगत असतात. पण तिच्या खासगी आयुष्यावर तिच्याशी मी कधीही चर्चा केली नाही आणि तशी चर्चा मी का करावी?,' असे जेमिनी गणेशन म्हणाले होते.

'सावित्री आणि पुष्पवलीशी मी काही वर्षांपूर्वी लग्न केले होते, तेव्हा मोठी खळबळ उडाली होती. मी मनोरंजन विश्वातला चर्चेचा विषय बनलो होताो. पण आता दिलीप कुमार यांनी अस्माशी लग्न केल्याचे किंवा धर्मेंद्रने हेमा मालिनीशी लग्न केल्याचे ऐकल्यावर कोणालाही काहीही वाटत नाही. इंडस्ट्रीमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा ट्रेंड मी सुरु केला', असे वक्तव्य जेमिनी गणेशन यांनी केले होते.

१० ऑक्टोबर १९५४ रोजी रेखा यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडिलांचे नाव जेमिनी गणेशन आणि आईचे नाव पुष्पावली असे आहे. रेखा यांना चार बहिणी होत्या. बालकलाकार म्हणून रेखा यांच्या सिनेकारकीर्दीची सुरुवात झाली होती. त्यांचे वडील जेमिनी गणेशन प्रसिद्ध अभिनेते होते. ते तमिळ चित्रपटसृष्टीत सक्रीय होते. तमिळ व्यतिरिक्त इतर दाक्षिणात्य भाषांमधील चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Delhi Bomb Blast Update: बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ला मोठं यश; उमरसोबत कट आखणाऱ्या i20 कारच्या मालकाला अटक

SCROLL FOR NEXT