Rashmika Mandanna Engagement SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna Engagement : नॅशनल क्रश रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Rashmika Mandanna flaunts Engagement Ring : रश्मिका मंदान्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यात तिच्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

रश्मिका मंदान्नाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले.

रश्मिका मंदान्ना-विजय देवरकोंडाचा साखरपुडा झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

रश्मिका मंदान्नाच्या हाताच्या साखरपुड्याची अंगठी दिसत आहे.

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna ) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे रश्मिकाचा साखरपुडा झाल्याची चर्चांना उधाण आले आहे. रश्मिकाचे एअरपोर्टवरचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात डाव्या हाताच्या बोटात साखरपुड्याची अंगठी घातलेली दिसत आहे.

रश्मिका मंदान्ना नुकतीच दुबईमधील एका कार्यक्रमात स्पॉट झाली. त्यावेळी तिच्या डाव्या हाताच्या बोटात अंगठी पाहायला मिळाली. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात रश्मिकाच्या बोटात अंगठी दिसत आहे. त्यामुळे तिने गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

एअरपोर्टवर कारमधून उतरताना आणि बसताना तिची ही अंगठी कॅमेरात कैद झाली. या दोन्ही व्हिडीओमध्ये रश्मिकाच्या हातात अंगठी दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच चाहते या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहे. त्यांच्या आगामी प्रोजक्टची वाट पाहत आहेत.

रश्मिका मंदान्ना लव्ह रिलेशनशिप

रश्मिका मंदान्ना खूप काळापासून साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाला ( Vijay Devarakonda ) डेट असल्याची चर्चा सुरू आहे. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. तसेच त्यांच्या सीक्रेट डेटचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. रश्मिका-विजयने अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांचा 'गीता गोविंदम' चित्रपट खूप गाजला. मात्र अद्यापही रश्मिका-विजयने आपल्या नात्यावर कोणतेही भाष्य केले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

SCROLL FOR NEXT