Rashmika-Vijay Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Rashmika-Vijay Wedding : लगीन घाई! रश्मिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचे घर पाहिलं का? विजय देवरकोंडाचा आलिशान बंगला सजला, VIDEO होतोय व्हायरल

Vijay Deverakonda Home Decoration For Wedding : साऊथ अभिनेता विजय देवरकोंडाच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. विजयचे घर लाइट्सने सजले आहे. सुंदर व्हिडीओ पाहा.

Shreya Maskar

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा फेब्रुवारी महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.

आता विजयच्या घराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात घराला सुंदर सजावट केलेली पाहायला मिळत आहे.

साऊथ स्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. हे इंडस्ट्रीतील एक क्युट कपल आहे. रश्मिका-विजय अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. अलिकडेच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती. व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी 2026 ला लग्न बंधात अडकणार आहे. तर लग्नाचे रिसेप्शन 4 मार्चला थाटामाटात पार पडणार आहे. लग्न सोहळा आणि रिसेप्शन दोन्ही हैदराबादमध्ये होणार आहे. चाहते या ग्रँड वेडिंगची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

अशात सोशल मीडियावर विजय देवरकोंडाच्या हैदराबादमधील घराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विजय हैदराबादमध्ये जुबली हिल्स (Jubilee Hills, Hyderabad) येथे राहतो. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे विजयचे घर नव्या नवरीसारखे नटले आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत विजयचे आलिशान घर फुलांच्या माळा आणि रंगीत लाइट्स सजलेले दिसत आहे. आकर्षक रोषणाईने घर चमकले आहे. व्हिडीओत गोल्डन लाईट्स पाहायला मिळत आहे. घर खूपच सुंदर आहे.

विजय देवरकोंडाच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. चाहते या व्हायरल व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करताना दिसत आहे. विजय आणि रश्मिकाचे चाहते या क्षणाची खूप वेळापासून वाट पाहत होते. अखेर तो क्षण जवळ आला आहे. चाहते दोघांचे लग्न सोहळा पाहण्यासाठी खूपच उत्सक आहेत.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 2018 ला रिलीज झालेल्या 'गीता गोविंदम' आणि 2019 साली 'डियर कॉमरेड' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. चाहत्यांना रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची केमिस्ट्री खूप आवडते. रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला. जवळचे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT