Rashmika-Vijay Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Rashmika-Vijay Wedding : यंदा कर्तव्य आहे! विजय देवरकोंडा चढणार बोहल्यावर; रश्मिका मंदाना होणार हैदराबादची सून, 'VIROSH' नं दिली प्रेमाची कबुली

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding Announcement : साऊथ इंडस्ट्रीचे जोडपे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्न बंधनात अडकणार आहे. अखेर जोडप्याने आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. ज्यामुळे चाहते खूपच खुश पाहायला मिळत आहेत.

Shreya Maskar

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे साऊथ इंडस्ट्रीचे पावर कपल आहे.

रश्मिका आणि विजयचा उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.

रश्मिका आणि विजयने अधिकृतपणे लग्नाची घोषणा केली आहे.

गेले अनेक वर्ष रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यानंतर दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉट केले गेले. थोड्या वर्षांनी 2025 मध्ये दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला आणि आता रश्मिका-विजय लग्न बंधनात अडकणार आहेत. मात्र या सर्व प्रवासात रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा कधीच आपल्या प्रेमाची किंवा नात्याची कबुली दिली नाही. ते कायम एकमेकांना पाठिंबा देताना दिसले, पण आपल्या नात्यावर कधीच बोले नाही. मात्र अखेर रश्मिका-विजयने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी अधिकृतपणे आपल्या नात्याची आणि प्रेमाची कबुली दिली आहे. तसेच लग्न करणार असल्याचेही सांगितले आहे. त्यांनी आपल्या लग्नाला चाहत्यांकडून आलेले खास नाव दिले आहे. रश्मिका-विजय VIROSH नावाने आपल्या नवीन नात्यांची सुरूवात करत आहेत.

रश्मिका- विजयने दिली नात्याची कबुली

"प्रिय चाहत्यांनो! जेव्हा आम्ही काही प्लान केला नव्हता...स्वतःसाठी काही ठरवलं नव्हते...तेव्हापासून तुम्ही आमच्या सोबत आहात...खूप प्रेमाने, तुम्ही आम्हाला एक नाव दिले...'विरोश' (VIROSH) त्यामुळे याच नावाने आम्ही आमच्या नात्याची नवी सुरुवात करतो. 'विरोशचे लग्न' असे नाव आम्ही देत आहोत. आमच्यावर इतके प्रेम केल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही कायमच आमचा एक भाग आहात. खूप प्रेम..."

Rashmika-Vijay Wedding

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी 2026 ला लग्न बंधात अडकणार आहे. तर लग्नाचे रिसेप्शन 4 मार्चला थाटामाटात पार पडणार आहे. लग्न सोहळा आणि रिसेप्शन दोन्ही हैदराबादमध्ये होणार आहे. चाहते आता या ग्रँड वेडिंगची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 2018 ला रिलीज झालेल्या 'गीता गोविंदम' आणि 2019 साली 'डियर कॉमरेड' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १९ तासांचा प्रवास फक्त १३ तासांवर; पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार

CMRF Maharashtra: मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मोठा डिजिटल बदल; रुग्णांना ८ तासांत मदतीचा निर्णय

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या शिरला

Face Care: सॉफ्ट ग्लोईंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी संध्याकाळी १० मिनिटांसाठी लावा ही घरगुती पेस्ट

विकासाच्या वेगात पर्यावरणाचा बळी? राज्यातील आणखी एका जिल्ह्यात १०० वर्षे जुन्या झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT