Nandish Sandhu SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nandish Sandhu : लोकप्रिय अभिनेता दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात; गुपचूप साखरपुडा उरकला, पाहा PHOTOS

Nandish Sandhu Engagement : प्रसिद्ध टिव्ही अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच साखरपुड्याचे सुंदर फोटो अभिनेत्याने शेअर केले आहेत.

Shreya Maskar

प्रसिद्ध टिव्ही अभिनेता नंदिश संधू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

नंदिश संधूने अभिनेत्री कविता बॅनर्जीसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

नंदिश संधू हा टिव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचा एक्स पती आहे.

लोकप्रिय अभिनेता नंदिश संधू (Nandish Sandhu) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच त्याने साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नंदिश संधूचे हे दुसरे लग्न आहे. टिव्ही अभिनेत्री रश्मी देसाई ही नंदिश संधूची पहिली बायको होती. रश्मीनंतर नंदिश संधूने अभिनेत्री कविता बॅनर्जीसोबत नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे.

नंदिश संधूने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नंदिश संधूने कविता बॅनर्जीसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. साखरपुड्याची अंगठी फ्लाँट करत दोघांनी फोटो शेअर केले आहे. या फोटोला त्यांनी हटके कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "हाय पार्टनर, तयार का?" वयाच्या 43 व्या वर्षी नंदिश संधू पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. नंदिश संधूने आपल्या होणाऱ्या बायकोसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

कविता बॅनर्जीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात दोघेचे हात दिसत असून ते साखरपुड्याची अंगठी फ्लाँट करत आहेत. तसेच तिने 05/09/25 अशी तारीख देखील लिहिली आहे. म्हणजे नंदिश आणि कविताचा साखरपुडा 5 सप्टेंबरला झाला आहे. साखरपुड्याच्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून प्रेमाचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वर्कफ्रंट

नंदिश संधूला 'उतरन' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. नंदिश टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. तर कविता बॅनर्जी देखील एक अभिनेत्री आहे. तिने 'एक व्हिलन रिटर्न्स' मध्ये काम केले आहे.

नंदिश संधू पहिले लग्न

नंदिश संधूचे पहिले लग्न 2012 मध्ये अभिनेत्री रश्मी देसाईसोबत झाले. त्यानंतर त्यांनी 2016 मध्ये घटस्फोट घेतला. अवघे 4 वर्ष त्यांचे नाते टिकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT