New Election Commissioner: मोठी बातमी! ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्तपदी निवड

Who Is Sukbhbir Sandhu& Gyanesh Kumar: पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने 2 निवडणूक आयुक्तांची निवड केली आहे. यामध्ये सेवानिवृत्त IAS अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे.
New Election Commissioner
New Election CommissionerSaamtv
Published On

New Election Commissioner:

सर्वात मोठी बातमी. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने 2 निवडणूक आयुक्तांची निवड केली आहे. यामध्ये सेवानिवृत्त IAS अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुरमु आज याला मंजुरी देतील त्यानंतर हे दोन्ही आयुक्त पदभार स्वीकारतील (Loksabha Election 2024)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी निवडणूक आयोगाच्या (EC) घोषणेपूर्वीच निवडणूक आयुक्तपदासाठी ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू यांची नावे निश्चित करण्यात आल्याचा मोठा दावा केला आहे. गुरुवारी (14 मार्च 2024) पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, "बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मी आणि अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील शोध समितीचे लोक उपस्थित होतो. यामध्ये या दोघांची नावे समोर आली आहेत. यामधील सेवानिवृत्त IAS अधिकारी ज्ञानेश कुमार हे केरळचे आहेत तर सुखबीर सिंग संधू हे पंजाबचे आहेत.

New Election Commissioner
Jalgaon Political News : रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्यानंतर नाराजीनाट्य; भाजप जिल्ह्याध्यक्ष जावळे समर्थकांनी दिले राजीनामे

दरम्यान, ज्ञानेश कुमार हे काही दिवसांपूर्वी सहकार मंत्रालयाच्या सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. मंत्रिपदाच्या स्थापनेपासून आतापर्यंत ज्ञानेश यांनी येथे काम केले. सहकार मंत्रालय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीत येते. यापूर्वी ज्ञानेश कुमार हे गृहमंत्रालयात काश्मीर विभागाचे सहसचिव होते, त्यांच्या काळातच कलम 370 हटवण्यात आले होते.

तसेच दुसरे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जम्मू-काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करण्यात महत्त्वाची भूमिका होती. गृहमंत्रालयात काम करताना त्यांनी जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकाच्या तयारीतही सक्रिय भूमिका बजावली. ते केरळ केडरचे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. (Latest Marathi News)

New Election Commissioner
Bhandara Accident News : भंडा-यात भीषण अपघात, दुचाकीस्वार हवेत उडून कारच्या छतावर काेसळला; चिमुकलीसह दाेघे गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com