Rapper Tory Lanez Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rapper Tory Lanez: भयंकर! प्रसिद्ध रॅपरवर तुरुंगात जीवघेणा हल्ला; छाती आणि पाठीवर १४ वार

Tory Lanez : कॅनडियन रॅपर टोरी लेनझ याच्यावर कॅलिफोर्नियातील टेहाचापी येथील तुरुंगात १२ मे २०२५ रोजी सकाळी ७:२० वाजता एका सहकैद्याने चाकूने हल्ला केला.

Shruti Vilas Kadam

Tory Lanez : कॅनडियन रॅपर टोरी लेनझ (Daystar Peterson) यांच्यावर कॅलिफोर्नियातील टेहाचापी येथील तुरुंगात १२ मे २०२५ रोजी सकाळी ७:२० वाजता एका सहकैद्याने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्याना पाठीवर ७, छातीवर ४, डोक्याच्या मागील भागावर २ आणि चेहऱ्यावर १ अशा एकूण १४ वार झाले. या गंभीर जखमांमुळे त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांवर परिणाम झाला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टोरी लेनझच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर त्यांना श्वासोच्छ्वासासाठी यंत्रावर ठेवण्यात आले होते. सध्या तो स्वतःहून श्वास घेऊ शकत असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तो चांगल्या अवस्थेत आहे आणि देवाचे आभार मानत आहेत. त्याच्या चाहत्यांचे आणि समर्थकांचे प्रार्थनांसाठी आभार मानले आहेत.

या हल्ल्याच्या कारणाचा तपास सुरू असून, कॅलिफोर्निया सुधारणा आणि पुनर्वसन विभाग, कर्न काउंटी जिल्हा अटर्नी कार्यालय आणि निरीक्षक जनरल यांचे कार्यालय संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. हल्लेखोराची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही.

टोरी लेनझ सध्या २०२० मध्ये रॅपर मेगन थी स्टॅलियनवर गोळीबार केल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा भोगत आहेत. २०२२ मध्ये त्याला तीन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात मेगनने न्यायालयात साक्ष दिली होती आणि टोरीवर पाच वर्षांची प्रतिबंधात्मक आदेश मिळवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT