Harshaali Malhotra: 'मी पाकिस्तानी नाही...'; बजरंगी भाईजानची 'मुन्नी' नेटकऱ्यांच्या प्रश्नांवर संतापली

Harshaali Malhotra: २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात 'मुन्नी'ची भूमिका साकारणारी हर्षाली मल्होत्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Harshaali Malhotra
Harshaali MalhotraSaam Tv
Published On

Harshaali Malhotra: २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात 'मुन्नी'ची भूमिका साकारणारी हर्षाली मल्होत्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका अलीकडील मुलाखतीत, तिला वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नामुळे ती संतापली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुलाखतीदरम्यान, हर्षालीला पुन्हा एकदा विचारण्यात आले की, 'बजरंगी भाईजान'मध्ये तिने पाकिस्तानी मुलीची भूमिका का साकारली? या प्रश्नावर तीने थेट आणि स्पष्टपणे उत्तर दिले की, "मी एक अभिनेत्री आहे आणि मला जे पात्र दिले जाते, ते मी साकारते. ते पात्र कोणत्याही देशाचे असो, माझे काम आहे ते प्रामाणिकपणे साकारणे. पण, मी पाकिस्तानी नाही" तिचे हे उत्तर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Harshaali Malhotra
Kangana Ranaut: 'युद्ध नव्हे, अज्ञान आपल्याला संपवेल'; कंगना रणौत यांचे नव्या पिढीवर टीकास्त्र

या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, अनेकांनी हर्षालीचे कौतुक केले. तिच्या चाहत्यांनी तिच्या अभिनय कौशल्याबरोबरच तिच्या स्पष्टवक्तेपणाचेही कौतुक केले. काहींनी म्हटले की, "हर्षालीने केवळ अभिनयातच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यातही उत्तम आहे."

Harshaali Malhotra
Prateik Smita Patil: प्रतीकने वडिल राज बब्बर यांना लग्नाला का नाही बोलावले? कारण सांगत म्हणाला, आई स्मिता पाटील...

हर्षाली मल्होत्रा सध्या तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे. तिने अलीकडेच १०वीच्या परीक्षेत ८३% गुण मिळवले आहेत. तिच्या या यशाबद्दलही सोशल मीडियावर तिचे कौतुक करण्यात आले. तिच्या या स्पष्टवक्तेपणामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com