Kangana Ranaut On Youth of india: बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी अलीकडेच एका मुलाखतीत नव्या पिढीच्या अज्ञानावर तीव्र टीका केली. त्यांनी सांगितले की, "आजच्या तरुण पिढीला देशाच्या राष्ट्रपतींचं नावही माहित नसते. त्यांना देशाच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि राजकीय घडामोडींची माहिती नाही." कंगनाच्या मते, ही अज्ञानता देशासाठी धोकादायक आहे.
कंगनाने पुढे सांगितले की, "युद्ध आपल्याला संपवणार नाही, पण अज्ञान आपल्याला नष्ट करेल." त्यांनी असेही नमूद केले की, "आजची पिढी सोशल मीडियावर वेळ घालवण्यात व्यस्त आहे, पण त्यांना देशाच्या महत्त्वाच्या बाबींची माहिती नाही." त्यांच्या मते, शिक्षण आणि जागरूकता हीच देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे.
मुलांना देशाच्या राष्ट्रपतींचे नाव माहित नाही
कंगना राणौतने तिच्या इंस्टा स्टोरीवर पोस्ट केलेल्या त्या व्हिडिओबद्दल बोलायचे झाले तर, त्यात काही मुलींना विचारले जात आहे की आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत. एका मुलीने उत्तर दिले- मी त्याचे नाव विसरले आहे. तर दुसरी म्हणाली- मला माहित नाही. मुर्मू किंवा असं काहीतरी. तिसऱ्या मुलीने उत्तर दिले – रामनाथ कोविंद, नाही का? पुढच्या मुलीने मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिले - जवाहरलाल नेहरू, ते पहिले राष्ट्रपती होते.
कंगनाच्या या विधानावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी तिच्या मतांना समर्थन दिले, तर काहींनी तिला 'अहंकारी' आणि 'स्वतःला सर्वज्ञ समजणारी' अशी टीका केली. तरीही, कंगनाने आपले मत ठामपणे मांडले आणि देशातील तरुणांनी अधिक जागरूक होण्याची गरज असल्याचे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.